राकेश रोशन दिग्दर्शित ‘कहो ना प्यार है’ आजही बऱ्याचजणांच्या आवडीचा चित्रपट ठरत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता हृतिक रोशन, अमिषा पटेल, अनुपम खेर यांच्या मुख्य भूमिका होत्या. २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची गाणी, हृतिकची प्रचंड गाजलेली ‘डान्स स्टेप’ या सर्व गोष्टींचे समीकरण इतके सुरेख जमले होते, की प्रेक्षकांच्या मनावर आजही या चित्रपटाची भुरळ पाहायला मिळते. अशा या चित्रपटामधील आणखी एका कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्या बालकलाकाराचे नाव आहे अभिषेक शर्मा. अभिषेकने या चित्रपटात साकारलेली निरागस भूमिका आणि रुपेरी पडद्यावर हृतिकसोबतचे त्याचे नाते प्रशंसेस पात्र ठरले होते. सिनेनॉलेजचा आजचा प्रश्न याच चित्रपटाशी निगडीत आहे. किंबहुना त्या बालकलाकाराशी निगडीत आहे.

प्रश्न- ‘कहो ना प्यार हैम’धील अभिषेक शर्मा म्हणजेच त्या बालकलाकाराने साकारलेल्या भूमिकेचं नाव काय होतं?
१. राज
२. मदन
३. अमित

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’

हृतिकसोबत रुपेरी पडद्यावर झळकल्यानंतर अभिषेक बराच चर्चेत आला. यानंतर त्याने सनी देओलच्या ‘चॅम्पियन’ या चित्रपटातही भूमिका साकारली होती. अभिषेक सध्या सोशल मीडियावरही बराच सक्रिय आहे. अभिनय क्षेत्राकडे त्याचा कल पाहता येत्या काळात ‘कहो ना प्यार है…’मधील तो लोकप्रिय बालकलाकार आता प्रसिद्ध अभिनेता म्हणून कोणत्या चित्रपटातून झळकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

अभिषेक शर्मा

गेल्या आठवड्यातील प्रश्नाचे उत्तर
प्रश्न- सुभाष घई यांचा पहिला दिग्दर्शित सिनेमा कोणता?
उत्तर – कालिचरण