‘जीएसटी’ नामक वादळाने काही दिवसांपूर्वी सगळ्यांना हादरून सोडलं. काहीजणांना हा बदल आवडला तर काहींनी नाराजी व्यक्त केली. कारण त्यामुळे सगळ्यांच्याच आयुष्यात छोट्यामोठ्या प्रमाणात बदल झाले. जीएसटीने ने सर्वांनाच हैराण केलं, हे काय कमी होतं की आता मनोरंजनावरही चक्क जीएसटी लागू होतोय आहे. पण, हा जीएसटी काहीसा वेगळा आहे. ‘जीएसटी’ म्हणजेच ‘गायब सगळं टेंशन’ असं म्हणत ही एक्सप्रेस प्रेक्षकांचं टेंशन क्षणात दूर करण्यासाठी सज्ज झाली आहे. या एक्सप्रेसमध्ये बसल्यानंतर प्रेक्षकांना चिंतांचा विसर पडणार आहे हे नक्की कारण ही एक्सप्रेस सगळ्यांना १००% हसण्याची हमी देणार आहे.

या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचा लाडका गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते मार्गदर्शकाच्या अथवा परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार नसून तो या कार्यक्रमाचा प्रथम प्रेक्षक असणार आहे. प्रियदर्शन जाधव आणि संदीप पाठक या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. या कार्यक्रमाची निर्मिती संतोष काणेकर यांच्या ‘अथर्व थिएटर्स’ने केली असून, ज्ञानेश भालेकर यांनी या कार्यक्रमाचं दिग्दर्शन केलं आहे.

ltt thivim 3 hour late marathi news
मुंबई: प्रवाशांच्या गोंधळानंतर अखेर रेल्वेगाडी सुटली, एलटीटी-थिवी रेल्वेगाडी तब्बल तीन तास उशिरा
Raigad, Private bus caught fire,
रायगड – मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर खाजगी बसला भीषण आग
indian railway hatia ernakulam express train google translate murder express
PHOTO : भारतीय रेल्वेला गूगल ट्रान्सलेशन वापरणे पडले भारी! ट्रेनचे नाव झाले ‘मर्डर एक्स्प्रेस’; प्रवाशांचा संताप
world's first self-driven electric
एप्रिल फुल नव्हे, खरचं चालकाशिवाय धावतेय ही दुचाकी! भाविश अग्रवालने केली Ola Soloची घोषणा, पाहा Video

‘कॉमेडीची GST एक्सप्रेस’ या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना त्यांच्या लाडक्या विनोदविरांचा अनोखा अंदाज पाहता येणार आहे. आशिष पवार, कमलाकर सातपुते, किशोर चौघुले, अदिती शारंगधर आणि प्राजक्ता हनमघर हे विनोवीर आपली एक्सप्रेस घेऊन प्रेक्षकांना हसविण्यासाठी सज्ज आहेत. कार्यक्रमाविषयी बोलताना अवधूत गुप्ते म्हणाले, ‘सर्वप्रथम गायक, मग संगीत दिग्दर्शक त्यानंतर निर्माता, सूत्रसंचालक, परीक्षक अशा अनेक रोलमध्ये मी माझ्या मायबाप प्रेक्षकांना भेटलो. हे प्रेक्षकचं माझे गुरु आहेत आणि मार्गदर्शक देखील ज्यांनी नेहमीच मला मार्ग दाखवला आणि मला प्रोत्साहन दिलं. आज त्यांच्याच शुभेच्छा आणि प्रेम या दोन्ही गोष्टी बरोबर घेऊन मी माझा नवीन प्रवास सुरु करतोय याचा मला खूप आनंद होत आहे. प्रेक्षकांना हसवणं खूप कठीण असतं. कलर्स मराठीवरील ‘कॉमेडीची GST एक्सप्रेस’ या कार्यक्रमामध्ये मी मार्गदर्शकाची भूमिका वठवणार नसून प्रथम प्रेक्षक असणार आहे. मी कार्यक्रमामध्ये असलेल्या विनोदवीरांबरोबर हसणार आहे, गाणार आहे, त्यांच्या उत्तम विनोदांना दाद देखील देणार आहे. या कलाकारांना मी प्रोत्साहन देणार आहे ज्यामुळे ते सामान्य माणसाला निखळ हसण्याचा आनंद देऊ शकतील, ज्यांच्या विनोदाने त्यांना त्यांच्या दु:खाचा विसर पडेल आणि नेहेमीच्या धकाधकीच्या आयुष्यातून बाहेर पडून त्यांना काही मोलाचे क्षण आमचे विनोदवीर या कार्यक्रमातून देतील.’