एकता कपूरची निर्मिती असलेली ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेला गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांची पसंती मिळतेय. टीआरपीच्या शर्यतीतसुद्धा ही मालिका नेहमीच आघाडीवर असते. मागील तीन वर्षांपासून नंबर वन राहिलेल्या या मालिकेविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीये. ‘राष्ट्रीय ग्राहक तक्रार मंच’मध्ये काही नाराज प्रेक्षकांनी ही तक्रार दाखल केली.

मालिकेच्या कथेसंदर्भात ही तक्रार असून मागील तीन वर्षांपासून एकाच दिशेने कथा सुरु असल्याचे यात म्हटले आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून मालिकेत तनू म्हणजेच अभिच्या प्रेयसीला गरोदर असल्याचे दाखवले जातेय. मालिकेविरोधात अशा प्रकारची तक्रार दाखल करण्याची ही पहिलीच घटना आहे.

वाचा : गर्भनिरोधक गोळ्या मोफत वाटा- कोंकणा सेन-शर्मा

मालिकेतील अभि आणि प्रज्ञामधील केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी विशेष पसंती दर्शवली आणि बार्कच्या BARC यादीत नेहमीच पहिल्या पाच क्रमांकामध्ये या मालिकेचा समावेश असतो. अर्थहीन कथा आणि रटाळपणाला कंटाळून अखेर याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीये.

वाचा : मी चौकटचा नाही बदामचा राजा- अशोक सराफ

ही मालिका जेन ऑस्टिनच्या ‘सेन्स अॅण्ड सेन्सीबिलीटी’ या पुस्तकावर आधारित असल्याचं म्हटलं जात होतं. पण या पुस्तकाचं आणि मालिकेचा काहीही संबंध दिसत नाही. इतर मालिकांप्रमाणेच या मालिकेमध्येही बुद्धीला न पटणारे खूप बदल करण्यात आले.