‘द कपिल शर्मा शो’ गेल्या काही आठवड्यापासून वादामध्येच अडकला आहे. कधी या शोचा स्टार कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातल्या वादामुळे हा सिनेमा चर्चेत येतो तर कधी सुनील ग्रोवर आणि इतर सहकाऱ्यांनी हा शो सोडला म्हणूनही हा शो सतत चर्चेत आला आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, चहावाल्याची व्यक्तिरेखा साकारणारा चंदन प्रभाकर या शोमध्ये परतणार आहे.
सुनील आणि कपिलमध्ये झालेल्या वादानंतर सुनीलसह, चंदन प्रभाकर आणि अली असगर या तिघांनीही एकाचवेळी हा शो सोडला होता. पण आता चंदन या शोमध्ये परत येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

‘कोणत्याही मुलीला किस केल्यास मी तुझे ओठ चिरेन’

का परतला चंदन प्रभाकर…

सुनील आणि कपिलमध्ये असा काही वाद झाला होता की ज्यामुळे हे तिघंही कपिलसोबत पुन्हा कधी एकत्र काम करतील असं वाटलं नव्हतं. पण अचानक चंदनने आपले मत बदलले असे म्हणावे लागेल. त्याच्या या बदललेल्या मताचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. कपिलच्या शोशी निगडीत एका सुत्राने सांगितले की, ‘चंदन जर या शोमध्ये परत येत आहे तर ही चांगलीच गोष्ट आहे. कपिल आणि चंदनने झालं गेलं विसरून जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय आता शोचा टीआरपीही चांगला आहे. ही पण एक आनंदाची बाब आहे. आमचं काम लोकांना हसवणं आहे. आम्ही शोमधून याचं भान पूर्णपणे राखलं आहे. त्यामुळे आमच्या दुसऱ्या शोमध्ये अली आणि कृष्णाही लोकांचं चांगलं मनोरंजन करतील अशी अपेक्षा आहे. आमचे दोन्ही शो चांगलं काम करतील अशी अपेक्षा आमची आहे.’

आपल्यापेक्षा वयाने मोठ्या अभिनेत्रीला डेट करतोय हा स्टार किड

शोमध्ये परतण्याबद्दल बोलताना चंदन म्हणाला की, ‘हो मी द कपिल शर्मा शोमध्ये परत येत आहे. मी चित्रीकरणालाही सुरूवात केली आहे. येत्या रविवारी कदाचित माझा एपिसोड प्रदर्शितही होईल. यापुढे प्रत्येक भागाच्या चित्रीकरणावेळी मी असणार आहे. ‘