टेलिव्हिजन विश्वात ‘मोस्ट कॉन्ट्रोव्हर्शिअल शो’ असा नुसता उल्लेख केला तरीही एका कार्यक्रमाचं नाव अनेकांच्याच तोंडी येतं तो कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस’. सेलिब्रिटींना काही दिवसांसाठी एका घरात कोणत्याही मनोरंजनाच्या साधनाशिवाय एकत्र ठेवत या कार्यक्रमाला तडका दिला जातो. यामध्ये साथ मिळते ती कार्यक्रमातील धमाल टास्क आणि सलमान खानच्या खुसखुशीत सूत्रसंचालनाची. अशा या बहुप्रतिक्षित रिअॅलिटी शोच्या ११ व्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे. नव्या पर्वात बिग बॉसच्या घरात सर्वसामान्य व्यक्ती आणि सेलिब्रिटी अशीच धमाल पाहता येणार आहे.

‘बिग बॉस’च्या या वादग्रस्त घरात नेमके कोणकोणते सेलिब्रिटी नजरकैदेत अडकणार हे जाणून घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय. अनेकांनी तर बऱ्याच सेलिब्रिटींच्या नावांविषयीचे तर्कवितर्क लावण्यासही सुरुवात केली. ‘बिग बॉस ११’च्या घरात सोशल मीडियावर आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री निया शर्मा, ढिंच्यॅक पूजा, प्रियांका चोप्रासारखी अगदी हुबेहूब दिसणारी कॅनडाची नवप्रीत बांगा आणि ‘भाभी जी घर पर है’ फेम अभिनेत्री शिल्पा शिंदे यांचा समावेश असल्याचं म्हटलं जात होतं.

vanchit Bahujan Aghadi, amravati,
वंचित बहुजन आघाडीतील फूट कुणाच्या पथ्‍यावर?
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Gold Hits All Time High, 2400.35 doller an Ounce, global market gold price, global market gold high, all time gold high in world, Global Economic Uncertainty , gold,finance news, finance article, marathi news, vietnam, america,
सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड

दरम्यान, ‘बॉलिवूड लाइफ’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री निती टेलर, ‘नीरजा’ चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता अब्रार झहूर, टिव्ही अभिनेता पर्ल पूरी हे चेहरे ‘बिग बॉस ११’ मध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये ‘चेन्नई एक्सप्रेस’चा ‘तंगबली’ म्हणजेच अभिनेता नचिकेत धीरसुद्धा सहभागी होणार असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, टेलिव्हिजन अभिनेत्री निती टेलरला एका मुलाखतीदरम्यान या विषयी विचारलं असता तिनेसुद्धा या वृत्ताला दुजोरा देत, आपल्याला ‘बिग बॉस ११’ची ऑफर आल्याचं म्हटलं होतं. पण, सध्यातरी मी त्याबाबतचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचंही तिने स्पष्ट केलं.

पाहा : असे चित्रीत झाले सलमान आणि त्याच्या शेजाऱ्यांचे घर

टेलिव्हिजन विश्वात आणखीनही काही नावं ‘बिग बॉस ११’च्या स्पर्धकांच्या शर्यतीत असल्याचं पाहायल मिळतंय. यामध्ये अभिनेता नंदीश संधू, कुणाल वर्मा, सुमीत भारद्वाज यांची नावं समोर येत आहेत. तेव्हा आता बिग बॉसच्या घरात नेमके कोणते सेलिब्रिटी येणार हे जाणून घेण्यासाठीची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे.