बालकलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी टेलिव्हिजनवर बच्चे कंपनीसाठी बरेच रिअॅलिटी शो सुरु असलेले आपण पाहतोय. त्यापैकी सध्या चालू असलेला असाच एक कार्यक्रम म्हणजे सोनी वाहिनीवरील ‘सुपर डान्सर’. अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा, दिग्दर्शक अनुराग बसू आणि नृत्य दिग्दर्शक गीता कपूर या शोचे परीक्षक आहेत. विशेष म्हणजे या शोची चर्चा होतेय ती महाराष्ट्रातील अवघ्या १० वर्षांच्या दिपाली बोरकर या चिमुकलीमुळे.
दिपालीने तिच्या नृत्य आणि अभिनय कौशल्याने तिन्ही परीक्षकांची मने जिंकली आहेत. पहिल्या राऊन्डमध्ये कंगना रणौतच्या ‘बावरी हो गई’ या गाण्यावर दिपालीने जो दमदार परफॉर्मन्स दिला त्यानंतर सर्वांचेच चेहरे पाहण्यासारखे होते. जणू काही आपल्यासमोर कंगनाच नाचत असल्याची प्रतिक्रिया शिल्पाने दिली. गीता यांनी तर चक्क उभं राहून तिच्या नृत्याला दाद दिली. दुस-या राउन्डमध्ये दिपालीने ‘नटरंग’च्या गाण्यांवर नृत्य सादर करताच बच्चेकंपनीना मुलांना या शोमध्ये प्रशिक्षण देणा-या मेन्टर्सनी दिपालीकडे धाव घेत तिला घट्ट मिठी मारली. प्रत्येक मेन्टरने सदर शोसाठी आपल्याला दिपालीच हवी असल्याचा आग्रह परीक्षकांकडे केला. परीक्षकांनीही एकमेकांची मते न जाणता दिपालीला थेट टॉप १२ मध्ये एण्ट्री देण्याचा निर्णय घेतला. दिपाली केवळ नृत्यातचं पारंगत नाहीए तर तिच्या चेह-यावरील हावभाव ही इतके बोलके आहेत की तिच्या प्रेमात पडल्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. सैराटमधील आर्चीच्या संवांदांनी तर सर्वांनाच भुरळ पाडली होती. दिपलीनेही आर्चीची हुबेहुब भूमिका साकारत परीक्षकांना मंत्रमुग्ध केले.

सुपर डान्सर या शोच्या मंचावर बच्चे कंपनी त्यांचे डान्स परफॉर्मन्स सादर करत असून त्यातून १२ मुलांची निवड करण्यात आली आहे. या १२ मुलांना प्रत्येकी एक प्रशिक्षक डान्सर देण्यात आलाय. या शोमध्ये दिपालीने महाराष्ट्राची बेबी कंगना रणौत म्हणून ओळख निर्माण केली आहे. ही बेबी कंगना आपल्या नृत्याने सर्वांना अजून किती दंग करणार हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे  राहिल.

Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
sanjay raut on yogi adityanath
योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “योगींनी यूपीतच थांबावं, तिथे…”
Udayanraje Bhosale, sharad pawar
“माझ्या बारशाचं जेवण…”, शरद पवारांच्या कॉलर उडवण्याच्या कृतीवर उदयनराजेंची प्रतिक्रिया