अभिनेत्री दीपिका पदुकोण बॉलिवूडमध्ये नावारुपास आल्यानंतर आता हॉलिवूडमध्येही स्वत:ची अशी एक ओळख बनवू पाहात आहे. ‘xXx- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी दीपिका सध्या विविध ठिकाणी अभिनेता विन डिझेलसोबत या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावत आहे. सध्या दीपिकाच्याच नावाची चर्चा असताना आता दीपिकाने हॉलिवूडमध्ये आणखी एक टप्पा पार केला आहे. दीपिकाने नुकतीच ‘द अॅलेन डिजेनेर्स शो’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या चित्रिकरणानंतर अवघ्या काही मिनिटांनंतरच दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही धम्माल फोटो शेअर केले आहेत.

जागतिक पातळीवर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पाहता दीपिकाचा सहभाग असलेल्या या चॅट शोच्या खास भागाचे प्रक्षेपण १८ जानेवारीला करण्यात येणार आहे. अॅलेनच्या सूत्रसंचालनाची खुमासदार शैली पाहता या खास भागासाठी प्रेक्षकांमध्येही उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. मुलाखतीच्या निमित्ताने अॅलेनच्या या कार्यक्रमात आलेल्या दीपिकाने सर्व प्रश्नांची धम्माल उत्तरे दिली आहेत असे म्हटले जातेय. अॅलेनसोबतच्या या गप्पांच्या ओघात दीपिका चित्रपटसृष्टीतील तिच्या आजवरच्या कारकिर्दीविषयी, खाजगी आणि सामाजिक जीवनाविषयीसुद्धा बोलताना दिसणार आहे.

SHE DID IT !!!!! @deepikapadukone and her troopers @jayasaha @karishma.prakash on the Ellen show @ellenshow

A photo posted by Shaleena (@shaleenanathani) on

this just happened… @theellenshow

A photo posted by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दरम्यान, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि विन डिझेल यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा ‘xXx- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ हा चित्रपट भारतात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूडची मस्तानी ‘सेरेना उनगेर’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. नुकतेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने अभिनेता विन डिझेल भारत दौऱ्यावर आला होता. यावेळी दीपिकाने मोठ्या उत्साहात विनसोबत तिच्या या पहिल्या हॉलिवूडपटाचे प्रमोशन केले. चाहत्यांच्या उदंड प्रतिसादाचा आणि प्रेमाचा अनुभव घेतल्यानंतर विन डिझेल मायदेशी परतला आहे. पण, भारतातून बऱ्याच आठवणींचा ठेवा त्याने आपल्यासोबत नेला आहे.

100k love you guys !!!!!! @deepikapadukone @jayasaha @karishma.prakash

A video posted by Shaleena (@shaleenanathani) on