‘स्लमडॉग मिलियनेयर’ यशाने देव पटेल या भारतीय वंशाच्या ब्रिटिश कलाकाराच्या कारकिर्दीला एक नवे वळण मिळाले.  या चित्रपटाने त्याला एक ओळख निर्माण करुन दिली असली तरी यातील भूमिकेनंतर  त्याला संघर्ष देखील  करावा लागला आहे. ‘स्लमडॉग मिलियनेयर’’ हा चित्रपट माझ्यासाठी वरदान आणि शाप अशा दोन्हींची अनुभूती देणारा चित्रपट असल्याचे मत २६ वर्षीय अभिनेता देव पटेल यांने व्यक्त केले आहे. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्लमडॉग मिलियनेयर’ या चित्रपटात देव पटेलने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या चित्रपटाने मला एक ओळख निर्माण करुन दिली असली तरी, या चित्रपटातील भूमिकेशिवाय  मी अन्य भूमिका देखील करु शकतो, हे सिद्ध करण्यासाठी मला संघर्ष करावा लागला, असे देव पटेल याने म्हटले आहे.

‘स्लमडॉग मिलियनेयर’ या चित्रपटातील भूमिकेमुळे मला ओळख निर्माण झाली, पण या चित्रपटातील भूमिकेतून मी अन्य भूमिका साकारु शकतो, हे सिद्ध करण्यासाठी मला संघर्ष करावा लागला, असे देव पटेल याने म्हटले आहे. या संघर्षामुळे मला ओळख निर्माण करुन देणारा ‘स्लमडॉग मिलियनेयर’ हा चित्रपट मला वरदान आणि शाप अशा दोन्ही अंगाचे दर्शन घडवून दिल्याचे देवला वाटते. देवने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लायन’ या हॉलिवूड चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री निकोल किडमॅनसोबक काम केले आहे. हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी देवने फारशी रुची आतापर्यंत दाखविलेली नाही.
‘स्लमडॉग मिलेनिअर’ या सिनेमाचे खरे स्टार अनिल कपूर, देव पटेल आणि फ्रिडा पिंटो हे होते. डॅनी बॉयल दिग्दर्शित ‘स्लमडॉग मिलेनिअर’ने तेव्हाच्या नावाजलेल्या सर्वच पुरस्कारांवर आपले नाव कोरले होते. २००९ चा ऑस्करही या चित्रपटाला मिळाला होता.

या चित्रपटाने  तन्वी लणकरला देखील एक नवी ओळख निर्माण करुन दिली होती.  लहानपणीची लतिकाची भूमिका साकारणारी तन्वी लोणकरने नुकतेच काही फोटो शेअर केले होते. या चित्रपटावेळी १४ वर्षांची तन्वी आता मोठी झाली आहे. आता ती फूर्णपणे फॅशन आयकॉन झाली आहे. या चित्रपटातील  भूमिकेसाठी तिला उत्कृष्ट अभिनयाचा १५ वा स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड अवॉर्डही मिळाला होता. डॅनी बॉयल दिग्दर्शित ‘स्लमडॉग मिलेनिअर’ने तेव्हाच्या नावाजलेल्या सर्वच पुरस्कारांवर आपले नाव कोरले होते. लतिकाचा जन्म मुंबईत झाला. पण सध्या ती अमेरीकेत राहत आहे.