बंगाली साहित्यकार शरदचंद्र चटर्जी यांच्या ” देवदास” या बहुचर्चित कादंबरीवर आधारीत हिंदी चित्रपटाप्रमाणे आता मराठीतही चित्रपट निर्माण होत असून त्याचा पहिला टीझर नुकताचं प्रकाशित झाला आहे. या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या लाँस्ट अँण्ड फाऊंड या चित्रपटाबरोबर तो प्रेक्षकांना दाखवण्यात येईल. ऋतुराज धालगडे या मराठी देवदासचे दिग्दर्शक असून अभिनेता मंगेश देसाई हा देवदासची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या भगवान दादांवरील एक अलबेला चित्रपटात त्याने खुद्द भगवान दादांची भूमिका साकारून सर्वांची प्रशंसा मिळवली होती. देवदास चित्रपटामधील पारो व चंद्रमुखी यांच्या भूमिकेसाठीच्या अभिनेत्रीची लवकरच निवड होणार आहे. हिंदीत यापूर्वीच तिनदा ‘देवदास’ पडद्यावर आला असून के.एल.सैगल , दिलीप कुमार व शाहरूख खान यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे प्रत्येकवेळी या चित्रपटाची भरपूर चर्चादेखिल झाली.
‘तुझं लग्न हे माझे स्वप्न होतं आणि ते मी पाहिलंही. पण तुझ्या रुपाच्या आणि मनाच्या सौंदर्यात इतका वाहून गेलो, की नवऱ्याच्या रुपात मलाच पाहायला विसरुन गेलो. आता तर साठलेल्या अश्रुंना पाऊलवाटही सापडत नाही गं… असे संवाद या टीझरमध्ये ऐकावयास मिळतात.