भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित ‘एम.एस. धोनी – दी अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातले ‘कौन तुझे’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे सिनेमात एमएस धोनीची व्यक्तिरेखा साकारणारा सुशांतसिंग राजपुत आणि अभिनेत्री दिशा पटनानी यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. गाण्याचे बोल मनोज मुन्तशिर यांनी लिहीले असून या सिनेमालील गाण्यांना अमान मलिकने संगीत दिले आहे. ‘कौन तुझे’ हे गाणे पलक मुछाल हिने गायले आहे.
हा सिनेमा धोनीच्या भारतीय क्रिकेट संघात येण्याआधीचे जीवन, २०११ वर्ल्ड कप, धोनीच्या प्रेयसीचा मृत्यू आणि नंतर साक्षीबरोबर लग्न यासारख्या घटनांवर भाष्य करतो. या सिनेमाचा शेवट २०११ वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यावर होतो. या सिनेमाचे दिग्दर्शन नीरज पांडे यांने केले आहे.
काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. यात धोनीच्या जीवनप्रवासाची एक छोटीशी झलक पाहायला मिळत आहे. धोनीची भूमिका साकारत असलेला सुशांत सिंग टीसीच्या गणवेशात गर्दीतून चालत आहे, या दृश्याने टिझरची सुरूवात होते. रेल्वेतील नोकरीच्या पहिल्याच दिवशी वरिष्ठांच्या सूचना नीट ऐकून घेणाऱ्या धोनीचा आवाजही टिझरमध्ये ऐकायला मिळत आहे. भारतीय संघाने विश्वचषक उंचावल्यानंतर होणाऱ्या धोनी नामाच्या गजरात टिझर संपतो.

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
Yash Mittal Murder Noida
व्यावसायिकाच्या मुलाची चार मित्रांकडून हत्या; वडिलांकडून मागितली सहा कोटींची खंडणी
emraan-hashmi-serial-kisser
“निर्मात्यांनी याचा गैरफायदा…” सुरुवातीच्या काळातील ‘सिरियल किसर’ या प्रतिमेबद्दल इमरान हाश्मी स्पष्टच बोलला
217 houses sold in Thane property fair
ठाण्याच्या मालमत्ता प्रदर्शनात २१७ घरांची विक्री