नवनवीन गोष्टी करण्याची आवड आणि उत्साह असणाऱ्या अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकतेच तिचे क्लोथिंग ब्रँड लाँच केले. ‘नुष’ असे या ब्रँडचे नाव असून लाँच झाल्यानंतर काही दिवसांनंतरच तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नवीन क्षेत्रात पदार्पण करण्याचा आनंद साजरा करत असतानाच अनुष्कासमोर एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. तिच्या ‘नुष’ या ब्रँडवर कपड्यांचे डिझाइन्स कॉपी केल्याचा आरोप लावला जात आहे.

‘नुष’ या ब्रँडअंतर्गत मिळणाऱ्या बऱ्याच कपड्यांचे डिझाइन्स हे एका चायनीज वेबसाइटवरून कॉपी केल्याचा आरोप केला जात आहे. यासंदर्भात ब्रँडच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की, ‘आमचे काही डिझाइन्स कॉपी झाल्याचे आम्हाला समजले. याविरोधात आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. आमच्या ब्रँडसारखेच डिझाइन्स इतर ठिकाणीही उपलब्ध असल्याचे पाहायला मिळाले. ज्या कंपनीला आम्ही या डिझाइन्सची जबाबदारी दिली होती त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे. विश्वासघात केल्याप्रकरणी आम्ही योग्य ती कारवाई करणार आहोत. त्या कंपनीकडून आम्ही जे डिझाइन्स मिळवले होते, तशाच प्रकारचे कपड्यांचे डिझाइन्स हे चायनीज वेबसाइटवर विकत असल्याची माहिती मिळाली.’

https://www.instagram.com/p/BaBjNv4AGLN/

https://www.instagram.com/p/BZ8BOs5AF0b/

वाचा : मतभेद असूनही बिग बींच्या श्रेष्ठत्वाबद्दल शंका नाही- राज ठाकरे

यासोबतच ‘नुष’च्या काही डिझाइन्समध्ये आणि प्रख्यात फॅशन ट्रेण्डमध्ये काही साम्य आढळेल, मात्र कॉपी केले असे म्हणता येणार नाही असेही प्रवक्त्याने स्पष्ट केले. अशा काही डिझाइन्सना ‘नुष’च्या कलेक्शनमधून काढून टाकणार असल्याची माहिती त्याने दिली. अनुष्काचा हा ब्रँड असल्याने साहजिकच डिझाइन्स कॉपी केल्याचा आरोप तिच्यावर केला जात होता. मात्र उत्पादन प्रक्रियेत तिचा सहभाग नसून डिझाइन्सबद्दल ती फक्त सल्ले देत होती असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. याप्रकरणी आता अनुष्का कोणती प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.