बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांनी पंजाबी चित्रपटसृष्टीत एन्ट्री केल्यानंतर आता एकता कपूरनेदेखील पंजाबी चित्रपटाच्या निर्मितीसाठी सज्ज झाली आहे. ‘सुपर सिंग’ या चित्रपटाच्या माध्यमातून एकता, पंजाबी चित्रपटसृष्टीत आपली एक नवी ओळख निर्माण करणार आहे. या चित्रपटामध्ये ‘उडता पंजाब’ मध्ये सरताज सिंगची भूमिका साकारणाऱ्या दिलजीत दोसांझ या चित्रपटात सुपर हिरोची भूमिका साकारताना दिसेल.