अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याची कथित प्रेयसी दिशा पटानी यांच्यातील प्रेमप्रकरणाच्या चर्चेला खुद्द टायगर श्रॉफने पूर्णविराम दिला आहे. दिशासोबत माझे केवळ मैत्रीचे नाते असल्याचे टायगरने म्हटले आहे. ‘बेफीक्रे’ या आगामी चित्रपटाच्या संगीत प्रदर्शन कार्यक्रमावेळी बोलताना दोघांनी एकमेकांना डेट करत असल्याचे वृत्त फेटाळून लावले. टायगर म्हणाला की, माझे दिशासोबत पडद्यासमोर आणि पडद्यामागील आयुष्यात देखील सुर चांगले जुळतात म्हणजे आमच्यात प्रेमाचं नातं आहे असं होत नाही. आम्हाला एकमेकांसोबत वेळ व्यतीत करायला आवडतो. आम्ही दोघंही एकत्र नृत्याचा सराव करतो.

वाचा: प्रेयसीला एकटं सोडून टायगर श्रॉफ हॉटेलमधून पसार!

दरम्यान, दिशानेही टायगर खूप जवळचा मित्र असल्याचे म्हटलं आहे. दिशा लवकरच क्रिकेटपटू एम.एस.धोनीवर आधारीत चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटातील भूमिकेबाबत दिशाला विचारले असता चित्रपटात मी धोनीच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीची भूमिका साकारत असल्याचे सांगितले.