दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक डाहिया ही टेलिव्हिजन विश्वातील सध्याची बरीच गाजलेली 'रीअल लाइफ' जोडी आहे. एका मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांमसोर आलेल्या या दोघांनी काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकत त्यांच्या नात्याला एक नवे वळण दिले आहे. दिव्यांका आणि विवेकच्या लग्नसोहळ्याची वेळोवेळची माहीती देत प्रसारमाध्यमांनीही त्यांच्या लग्नसोहळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अतिशय थाटामाटात झालेल्या या विवाह सोहळ्यानंतर दिव्यांका आणि विवेकने त्यांच्या मित्रपरिवारासाठी रिसेप्शनचेही आयोजन केले होते. दिव्यांका आणि विवेकच्या बहुचर्चित लग्नसोहळ्याचा उलगडा करणारी त्यांची लग्नगाथा आता लवकरच त्यांच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. दिव्यांका आणि विवेक एकमेकांना भेटण्यापासून त्यांच्या प्रेमाची स्वीकृती आणि आता लग्नाच्यापर्यंतच्या प्रवासाचा सुरेख उलगडा दे दोघेही त्यांच्या 'रंग दे' या व्हिडिओतून करणार आहेत. त्यांच्या या व्हिडिओचा 'टिझर' या नवविवाहित जोडप्याने आपआपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. चाहत्यांच्या मनात आधीच घर करुन असलेल्या या दोन्ही कलाकारांची अनोखी प्रेमकथा जाणून घेण्यासाठी रसिकांमध्येही प्रचंड उस्तुकता पाहायला मिळत आहे. दिव्यांका त्रिपाठी ही ‘स्टार’ वाहिनीच्या ‘ये है मोहोब्बते’ या मालिकेतून ‘इशिता भल्ला’ (इशिमा) या सालस भूमिकेतून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचली होती. तर विवेक डाहियासुद्धा त्याच मालिकेत एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत होता. #FirstTeaser #WeddingTrailerFilm #DivekWeddingDiaries. @officialvivekdahiya @theweddingstoryindia (#WeddingTrailer - A gift for fans and friends) A video posted by Divyanka Tripathi Dahiya (@divyankatripathidahiya) on Jul 23, 2016 at 3:27am PDT