दिवाळीची लगबग सुरु झाली की घराघरांमध्ये फराळाच्या पदार्थांचे खमंग वास येतात, दारात लावला जाणारा कंदील, पणत्या, तोरणं यांची खरेदी सुरु होते. संपूर्ण वातावरण चैतन्यमय होऊन जाते. दिवाळीच्या दिवशी दिव्यांच्या असंख्य ओळी लावल्या जातात. खासकरून लहान मुलांची दिवाळीत धामधूम असते. किल्ले तयार करणे, दिवसभर फटाके फोडणे या लहानपणीच्या आठवणी घेऊनच आपण सगळे मोठे झालेलो असतो. अशाच काही आठवणींना अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशी हिने उजाळा दिला आहे. मनोरंजन विश्वातील या हरहुन्नरी अभिनेत्रीने आठवणीतील दिवाळीवर ब्लॉग लिहला आहे.

सेलिब्रिटी रेसिपी: प्रिया बेर्डेची ‘डाएट स्पेशल नॉनव्हेज रेसिपी’

How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
kairi curry recipe in marathi
Recipe : हिरव्यागार कैऱ्यांचे आंबटगोड सार; कसे बनवायचे पाहा कृती अन् प्रमाण
Holi 2024, Natural Colors, Children, Celebrate, Harmful Chemicals, parents, caring tips, skin, eye, infection,
होळीतील रासायनिक रंगाने डोळे, त्वचेच्या आजाराचा धोका! मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज
issues of society
शब्द शिमगोत्सव

स्पृहाचा दिवाळी हा खूप आवडता सण आहे. या सणादरम्यान ती वेगळ्याच झोनमध्ये असते असे म्हणते. फराळाचा तिखट गोड वास, चकलीच्या भाजणीचा, बेसन खमंग भाजल्याचा, चिरोट्याच्या पाकाचा, चिवड्याच्या फोडणीचा, सगळ्या संवेदनांना जागं करणारा हा माहौल, अभ्यंगस्नानाचं गरम पाणी, सुगंधी तेल, उटणी… हे तिला खूप आवडतं असे तिने ब्लॉगमध्ये लिहिलंय.

दिवाळी २०१७ : ‘चिन्मय म्हणजे माझ्यासाठी फराळातला चिवडा’

दिवाळी म्हटलं की मोती साबण आलाच. आजही अनेक घरांमध्ये दिवाळीच्या औचित्यावर मोती साबण आणला जातो. याच्याशी जोडलेल्या आठवणी सांगताना स्पृहाने लिहिलं की, आम्हा चौघी-बहिणींना माझी आजी दर दिवाळीत ‘मोती’ साबण द्यायची गिफ्ट म्हणून, माझ्या आठवणीतील दिवाळी म्हटली की ‘मोती साबणा’चा सुवास अजूनही गंधित होत जातो. मी कधीच फटाके उडवले नाहीत. एखादी फुलबाजी, भुईचक्र आणि डोक्यावरून पाणी म्हणजे अनार. त्यापलीकडे कधी जाताच आलं नाही. तडतडी फुलबाजी सुद्धा हातावर ठिणग्या उडतात म्हणून चार कोस लांब धरायची. केपाची बंदूक सुद्धा नाही. त्यातून उलट्या बाजूने टिकल्या फुटतील ही भीती मला अगदी सातवी आठवीपर्यंत वाटत राहिली, फटाक्यांची भीती वाढायला मला वाटतं, दोन तीन गोष्टी असाव्यात, एक तर पहिली भीती, खूप मोठ्या आवाजाची. दुसरी, माझ्या आईच्या हातावर ती दुसरी तिसरीत असताना अनार फुटला होता. ही गोष्ट कधीच डोक्यातून गेली नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला अनार फुटताना उडणाऱ्या कारंज्या आधी ‘हा आपल्या हातावर फुटला तर काय’? ही भीती मला पोखरून काढायची आणि तिसरी सगळ्यात महत्वाची भीती एक मराठी सिनेमा पाहताना डोक्यात बसलेली, सविता प्रभुणे आणि सतीश पुळेकर आहे त्यात. ऐन दिवाळीच्या दिवसात त्यांची दोन मुलं फटाक्यांनी भाजून मरतात असं काहीसं दृश्य होतं त्या सिनेमात. ते मी कधीच नाही विसरू शकले. अगदी आताही..

स्पृहाने तिच्या या ब्लॉगमध्ये बालपणातील अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.