18 August 2017

News Flash

सुहाना खानच्या या ड्रेसची किंमत जाणून तुम्हालाही धक्का बसेल

आता शाहरुखच्या लेकीसाठी ही काही मोठी रक्कम नाही म्हणा.

मुंबई | Updated: June 19, 2017 5:41 PM

नुकत्याच झालेल्या ‘अर्थ’ रेस्तराँच्या उदघाटनाप्रसंगी बादशहा शाहरुख खानची मुलगी सुहाना हिच्याकडेच सर्वांच्या नजरा वळल्या होत्या. गौरी खानने डिझाइन केलेल्या ‘अर्थ’ रेस्तराँचे अगदी आलिशान पद्धतीने उदघाटन करण्यात आले. वडील शाहरुखसह सुहानाने कार्यक्रमाच्या ठिकाणी अगदी ग्रॅण्ड एण्ट्री केल्याचं पाहायला मिळालं. तसेच, यजमानपद भूषवणाऱ्या सुहानाने सर्व पाहुण्यांचे आदरातिथ्य केले. नुकतीच १७ वर्षांची झालेली सुहाना तिच्या फॅशनसाठी नेहमीच चर्चेत असते. अगदी साध्या कपड्यांमध्येही तिचे सौंदर्य खुलून आल्याचं याआधी बऱ्याचदा पाहायला मिळालं आहे. मग आपल्या आईसाठी खास दिवस असलेल्या दिवशी सुहाना खास लूकमध्ये दिसणारच ना.

वाचा : या लबाडासाठी इलियानाचं नेहमीच झुकतं माप असतं

अर्थ रेस्तराँच्या उदघाटनला या स्टार किडने सर्वांचेच लक्ष वेधले. टॅन्जेरीन बॉडी हगिंग ड्रेस घातलेली सुहाना गाडीमधून बाहेर पडताच फोटोग्राफर्सनी शाहरुखला सोडून तिचेच फोटो काढण्यास सुरुवात केली. स्लिवलेस ड्रेसमध्ये सुहानाचे सौंदर्य अधिकच खुलून आले होते. या ड्रेसची किंमत जवळपास ६०००० रुपये इतकी आहे. आता शाहरुखच्या लेकीसाठी ही काही मोठी रक्कम नाही म्हणा.

suhana-khan-6

गळ्यात कोणतीही ज्वेलरी न घालता सुहानाने अगदी साधा लूक ठेवत तिचे केस मोकळे सोडले होते आणि पायात पम्प शूज घातलेले. जास्त भडक मेकअप न करता हलक्या रंगाची लिपस्टिक तिने लावल्याचे दिसते. त्यामुळे, किंग खानऐवजी त्याच्या प्रिन्सेसवर सर्वांच्या नजरा खिळल्या यात काहीच शंका नाही.

वाचा : अशोक सराफ यांच्या हसून हसून मेंटल करणाऱ्या ‘शेंटीमेंटल’चा ट्रेलर

suhana-khan-2

या उदघाटन सोहळ्याला बी-टाउन सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली. अनिल कपूर, आलिया भट्ट, अर्जुन कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, जॅकलीन फर्नांडिस, सोनम कपूर, मलायका अरोरा, क्रिती सनॉन, सुशांत सिंग राजपूत यांसारखे अनेक सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते.

suhana-khan-8

suhana-khan-1

First Published on June 19, 2017 5:41 pm

Web Title: do you know the cost of suhana khans tangerine bandage dress
 1. S
  Shweta
  Jun 19, 2017 at 11:12 pm
  Paid news ? She is looking cheap .... Any ordinary girl looks better than her. Not expected such kind of news from Loksatta.
  Reply
 2. V
  Vinit Patil
  Jun 19, 2017 at 7:16 pm
  लोकसत्ता पपेरची ा लाज वाटते . अभिनेताच मुलगा , मुलगी कुठे दिसली , त्यांनी काय कपडे घातले होते , कुणासोयाबीत होते असल्या चिर्कुट बातम्या देणे एवढेच बाकी राहिले होते आता तुमच्याकडडून .
  Reply