‘टीव्ही’वरची सरकती पट्टी रीमाताईंच्या जाण्याची अभद्र  वार्ता देऊन गेली. धक्का, दु:ख, आश्चर्य, कुतूहल या सगळ्या गोंधळातून सावरायला वेळ लागला. नाटय़ आणि सिने क्षेत्रातील जाणकार सहकाऱ्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि माझे मन अधिकच अस्वस्थ झाले. किती रूपे रीमाताईंची डोळ्यासमोरून सरकली.

‘‘सामने है समधीजी, गा रही समधन है’’.. गाणाऱ्या, ढोलक वाजवणाऱ्या रीमाताई, पोटच्या पोरावर बंदूक चालवून त्याला मुक्ती देणारी ‘वास्तव’मधील रीमाताई, सासू-सुनेच्या विवादांना विनोदाचं कोंदण बहाल करणाऱ्या रीमाताई.. पण त्यापलीकडे जाऊन मला त्यांची एक ‘कुंती’ आठवली. कर्णाकडे याचना करणारी, दूर केलेल्या उभ्या जन्माचे ऋण शेवटच्या क्षणी आपल्याच पुत्राकडे भीक म्हणून मागणारी, तडफडणारी राजमाता.. रीमाताई सशक्त अभिनेत्री होत्या पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे संवेदनशील माणूस होत्या. आज त्यांची आठवण काढताना अनेकांनी ‘ग्लॅमरस मॉम’ म्हटले आहे.

ST bus, msrtc, caught fire, thane, Pali, passengers, safe,
ठाण्यात एसटी बसगाडीमध्ये आग, प्रवासी सुखरूप
dawood ibrahim
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील नातेवाईकाची लग्नात गोळ्या झाडून हत्या!
love triangle nagpur
‘पती, पत्नी और वो…’ प्रेमाच्या त्रिकोणातून दोन संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; भरोसा सेलने…
Buldhana Lok Sabha Constituency claimed by Vanchit Bahujan Aghadi which added to complexity of candidature
बुलढाण्यात ‘वंचित’च्या दाव्याने महाविकासआघाडीत पेच!

रजत पडद्यावर ग्लॅमर म्हणजे उत्तान भडकता नव्हे तर शालीन, खानदानी आब याची साक्ष त्यांना पाहिल्यावर पटते. अतिशय सुंदर कांती आणि तेजस्वी डोळे ही त्यांची देवदत्त दौलत होती तर अनुभवसंपन्न चेहरा आणि भावनांचे प्रतिबिंब आरशात पडावे असा आविष्कार ही त्यांची मेहनत होती. त्यांच्या आवाजाला एक वेगळाच पोत होता. काहीसा ‘हस्की’ घोगरा पण क्षणात कातरता आणि दुसऱ्या क्षणांत जरब बसवण्याचे त्यांचे कौशल्य एकमेवाद्वितीय होते. ‘आई’ म्हटल्यावर आपल्याला आपल्या जन्मदात्री पलीकडे फक्त निरुपा रॉय आणि रीमाताई यांची आठवण व्हावी इतके त्यांचे संचित होते.

रीमाताईंनी मराठी नाणे हिंदी चित्रपटसृष्टीत खणखणीत वाजवले. मराठी नाटय़-सिने-सीरिअल विश्वावर अधिराज्य गाजवले आणि माझ्यासारख्या असंख्य मराठी जनांची आयुष्यं समृद्ध केली. आज का कोण जाणे भक्ती बर्वेची आठवण झाली. अश्विनी एकबोटेंची आठवण झाली आणि असं वाटलं सांगावं सगळ्या मराठी अभिनय क्षेत्रातील मित्र-मैत्रिणींना.. तुम्ही आम्हाला खूप हवे आहात. थोडं स्लो डाऊन करा. पैशांची निकड कळते पण आठवडय़ातील सातच दिवस काम करा. दिवसांतून तीन शिफ्ट्स नकोत. दौरे आखताना विचार करा. अगदी आयोजित कार्यक्रम, भाषणे, उद्घाटने करतानाही थोडा स्वत:च्या स्वास्थ्याचा विचार करा. चाळिशीनंतर दरवर्षी मॅमोग्राफी, ई.सी.जी., सी.टी., अँजिओग्राफी करा.. रिपोर्ट नॉर्मल आल्यामुळे पैसे फुकट गेले म्हणू नका. अशा काही धक्कादायक, अनपेक्षित एक्झिट्स टाळायच्या असतील तर एवढं करा. आमचं वैद्यकशास्त्र प्रगत आहे पण परफेक्ट नाही हेच सत्य..