अभिनेत्री सोहा अली खानच्या बेबी शॉवरचे सुरेख फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. या फोटोंमध्ये चिमुकल्या तैमुरने सर्वांचे लक्ष वेधले. सोहानंतर आता अभिनेत्री इशा देओलचा बेबी शॉवर लवकरच करण्यात येणार आहे. येत्या २७ ऑगस्टला म्हणजेच सहा दिवसांनंतर इशाचा बेबी शॉवर करण्यात येणार आहे. होणाऱ्या आईबाबांसोबतच संपूर्ण कुटुंब आणि मित्रमंडळींसाठीही बेबी शॉवर हा आनंदाचा क्षण असतो.

बॉलिवूडमध्ये ऑनस्क्रीन बेबी शॉवरचा कार्यक्रम नेहमीच अनोख्या पद्धतीने साजरा करताना दाखवण्यात आलाय. ‘हम आप के है कौन’ चित्रपटातील ‘दीदी तेरा देवर दीवाना’ हे गाणे तर सर्वांना चांगलेच माहित असेल. इशाचा बेबी शॉवर कशापद्धतीने करण्यात येईल याची सर्वांना उत्सुकता असतानाच त्यासंबंधीची काही माहिती आता समोर आली आहे. इशा भरत तख्तानीसोबत पुन्हा एकदा लग्न करणार असल्याचं म्हटलं जातंय.

https://www.instagram.com/p/BX8B55iBQUW/

वाचा : टायगरच्या एका इशाऱ्यावर दिशाने रॅम्प वॉकवरुन घेतली माघार

सूत्रांच्या माहितीनुसार २७ ऑगस्ट रोजी इशा आणि भरत पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत. सिंधी पद्धतीनुसार ते दोघे पुनर्विवाह करणार आहेत. देओल आणि तख्तानी कुटुंबियांसाठी हा नक्कीच आनंदाचा क्षण असेल.

https://www.instagram.com/p/BX9t3znBTYA/

दरम्यान इशा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. काही दिवसांपूर्वीच तिने ‘मॅटर्निटी फोटोशूट’चे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ग्रीसमध्ये ईशा आणि भरत यांनी हा फोटोशूट केला होता.