इंधना मिरवा गैती मोरी सैय्या.. हे गाणे कानावर पडले की आपल्या समोर एकच चेहरा येतो तो म्हणजे गायिका फाल्गुनी पाठक हिचा. बॉलिवूडमध्ये फाल्गुनी पाठक हे एक प्रसिद्ध नाव होतं. आपल्या सुरेल आवाजासाठी नावाजली जाणारी गायिका बॉलिवूडमधून अचानक गायब झाली. पण आपल्या बॉय लूकसाठी प्रसिद्ध असलेली ही गायिका गेली कित्येक वर्षे आपल्या गाण्यांनी गरबा रसिकांना थिरकण्यास भाग पाडतेय.

वाचा : या गोष्टींसाठी दिव्यांकाने मागितली पंतप्रधानांकडे मदत

५१ वर्षीय फाल्गुनीने अद्याप लग्न केलेले नाही. गुजराती कम्युनिटीमध्ये फाल्गुनी बरीच प्रसिद्धी आहे. आजच्या घडीला ती चित्रपटांसाठी गाणी गात नसली तरी स्टेज शो करण्याकडे तिचा कल आहे. नवरात्रौत्सवामध्ये फाल्गुनी फाटकच्या गाण्यांना अनेकांचीच निर्विवाद पसंती असते. तिचे स्टेज शो बुक करण्यासाठी नवरात्रीमध्ये तर रांगा लागतात. पण, या गायिकेच्या स्टेज शोसाठी तारखा बुक करणे इतके सोपे नाही. कारण ती एका स्टेज शोसाठी तब्बल २२ लाख रुपये मानधन घेते. या नऊ दिवसांमध्ये ती जवळपास दोन कोटींच्या घरात कमाई करते. फाल्गुनी ‘डांडिया क्वीन’ म्हणून देखील प्रसिद्ध आहे.

वाचा : सचिन- लक्ष्मीकांत बेर्डे यांचा घरोबा नव्या पिढीच्या साथीने जाणार पुढे

यंदा २१ सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होत असून, तिच्या शोचे बुकिंग करण्यासाठीही सुरुवात झाली आहे. १९९८ साली तिने करियरला सुरुवात केलेली. तिची ‘चूड़ी जो खनकी’, ‘मैंने पायल है छनकाई’ आणि ‘मेरी चूनर उड़-उड़ जाए’ ही गाणी बरीच प्रसिद्ध आहेत. लहानपणासूनच मी स्टेज परफॉर्मन्स करत आलेय, असे फाल्गुनीने एका मुलाखतीमध्ये सांगितलेले. फाल्गुनीला अनेक चित्रपटांमध्ये गाण्याच्या ऑफर आल्या होत्या. मात्र, तिने सर्व ऑफर्स नाकारत स्टेज शोलाच प्राधान्य दिले.