काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राय बच्चन आणि अनिल कपूर यांचा ‘फेनी खान’ हा सिनेमा येणार असल्याची माहिती आम्ही तुम्हाला दिली होती. या सिनेमात अॅश आणि अनिल रोमान्स करताना दिसणार का, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. पण निर्मात्यांनी ही शक्यता फेटाळून लावत, याबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. पण आता या चित्रपटात अॅश- अनिल यांच्यात रोमान्स नसेल तर मग सिनेमाची कथा नक्की काय असेल, अनिल नाही तर मग अॅश कोणासोबत दिसणार, असे अनेक नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. परंतु निर्मात्यांनी चाहत्यांची ही शंकाही दूर केली आहे. ऐश्वर्या या सिनेमात आर. माधवनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

शिधापत्रिकेतून नागराज मंजुळेंचे नाव होणार रद्द

काही दिवसांपूर्वीच अनिल कपूरने एका मुलाखतीत ऐश्वर्यासोबत काम करणार असल्याचे संकेत दिले होते. यावेळी अनिल कपूरने म्हटले होते की, ‘अॅशसोबत काम करण्यास मी खूप उत्सुक आहे. खूप वर्षांनी आम्ही एकत्र काम करणार आहोत. मात्र ती माझ्या अपोझिट नसल्याचे मला सर्वाधिक दु:ख आहे. या सिनेमात आमच्या दोघांचे बरेचसे सीन्स एकत्र आहेत. मात्र आमच्या दोघांवर कुठलेही रोमान्सचे दृश्य चित्रित करण्यात आलेले नाही.’

दरम्यान, या सिनेमात आर. माधवनच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याआधी राजकुमार राव, विक्की कौशल तसेच अक्षय ओबेरॉय यांच्या नावाचाही विचार करण्यात आला होता. अक्षयचे नाव तर जवळपास निश्चित झाले होते, पण विवेक आणि ऐश्वर्याचे जुने नाते पाहता अक्षयनेच या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतला.  अक्षयने हा सिनेमा सोडला आणि त्याचा फायदा माधवनला झाला असेच म्हणावे लागेल. ‘रेहना है तेरे दिल मैं’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या माधवनने हिंदीत अनेक सिनेमे केले आहेत. याआधीही ‘गुरू’ सिनेमात माधवन आणि ऐश्वर्याने काम केले होते. पण आता पहिल्यांदा ते एकमेकांच्या अपोझिट काम करणार आहे. त्यामुळे ‘फेनी खान’मध्ये त्यांची ही जोडी प्रेक्षकांना कितपत पसंतीला उतरणार, हे तर सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर कळेलच.