बाहुबली – २ जबरदस्त आहे किंबहुना तो असणारच अशी सगळ्या  सिनेरसिकांची खात्री आहे. कटप्पाने बाहुबलीला का मारलं या प्रश्नाचं उत्तर ‘बाहुबली २- द कन्क्लुजन’ मध्ये पाहायलास मिळणार असल्यामुळे सगळेजणच शुक्रवारची वाट पाहत आहेत.

पण ‘बाहुबली- २ झकास आहे’ हे तो सिनेमा पाहून म्हणण्याचं भाग्य काही मोजक्या जणांनाचा सध्या मिळतंय. त्यातले एक आहेत ते उमैर संधू

उमैर संधू सध्या दुबईमध्ये आहेत. त्यांनी  दुबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचा प्रीमियर झाला आणि या प्रीमियरला या सिनेमाची लीड जोडी प्रभास आणि अनुष्का शेट्टी हजर होते. तिथे उपस्थित असलेल्या उमैर संधू यांनी हा  सिनेमा सुरू असताना ट्वीट करत हा सिनेमा ‘स्पेक्टॅक्युलर’ असल्याचं जाहीर केल. या सिनेमामध्ये एकही कंटाळवाणा क्षण नसल्याचं त्यांनी सांगितलं तर सिनेमा संपल्यावर हा ‘आॅल टाईम ब्लाॅकबस्टर’ असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं. पाहा त्यांची ट्वीट्स

 

 

 

 

एखादा दक्षिणेतला सिनेना संपूर्ण भारतभर सुपरहिट होतो असं फार क्वचित होतं. ‘बाहुबली’च्या रूपाने या समजाला मोठा छेद गेला. भारतातल्या सर्व मार्केट्समध्ये हा सिनेमा हिट ठरला. सिनेमाची कथा, त्यातले स्पेशल इफेक्ट्स आणि उत्सुकता ताणणारा शेवट या सगळ्यामुळेय हा सिनेमा कमालीचा यशस्वी झाला. आता त्याचा दुसरा भागही तसाच सुपरहिट ठरण्याची चिन्हं आहेत.