सब टीव्हीवरच्या ‘एफआयआर’ या विनोदी कार्यक्रमातून पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटविणारी  चंद्रमुखी चौटाला अर्थात कविता कौशिक लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. कविता तिच्या रोहित बिस्वास या मित्रसोबत लग्न करण्याचे पक्के झाले असून या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त देखील पक्का झाला आहे. २७ जानेवारीला कविता  केदारनाथ या पवित्र ठिकाणी रोहितशी लग्न गाठ बांधणार आहे. या दोघांचा लग्न सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थित पार पडणार असल्याचे समजते.

पिता आणि रोहित या दोघेही शिवभक्त आहेत. त्यामुळे त्यांच्या श्रद्धेमुळे केदारनाथ या ठिकाणी लग्न करण्याचे ठरविल्याचे कविताने एका मुलाखतीमध्ये म्हटले. रोहितसोबत कविताची देखील शंकरावर श्रद्धा आहे. अर्थात या कारणामुळेच भगवान शंकराच्या आशिर्वादाने ही जोडी आपल्या संसाराची सुरुवात करणार आहे. रोहित बिस्वास याची स्वत:ची कंपनी आहे. रोहित आणि कविता एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून ओळखतात. रोहित तिचा चांगला मित्र होता. जवळ-जवळ एक वर्ष एकमेकांसोबत वेळ घालविल्यानंतर कविताने आयुष्याचा जोडीदार म्हणून रोहितची निवड केली.

सब टीव्हीवरच्या ‘एफआयआर’मध्ये आत्तापर्यंत इन्स्पेक्टर चंद्रमुखी चौटालाच्या (कविता कौशिक) जोडीला अनेक कलाकारांनी काम केले आहे.  इन्स्पेक्टर भोला पंडितच्या भूमिकेत अभिनेता विपुल रॉयने देखील छोट्या पडद्यावर कवितासोबत स्क्रिन शेअर केली आहे. चंद्रमुखी भूमीकेत चंद्रमुखी विनोदी अंदाजात गुन्हेगारांचा छडा लावताना दिसली आहे.‘एफआयआर’ या  कार्यक्रमाच्या भूमिकेतून चंद्रमुखी चौटालाच्या भूमिकेत कविता कौशिक घराघरामध्ये पोहचली. या शोमधील प्रत्येक व्यक्तिेरेखेचा विनोदाचे टायमिंग, विनोदाची जाण, संवादफेकीची शैली यामुळे ही मालिका मला प्रचंड लोकप्रिय ठरली आहे.