मराठी चित्रपटाला ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा दिग्दर्शक नागराज मंजुळे याचा आज वाढदिवस. नागराजचा जन्म २४ ऑगस्ट १९७७ रोजी झाला. नागराज केवळ एक दिग्दर्शक नसून तो उत्तम कविताही करतो. त्याच्या  ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ या कवितासंग्रहाला दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला आहे. नागराजच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्याच्याच शब्दातून रचलेली ही खास काव्यमैफल तुमच्यासाठी:

१. ‘पावसालाही आवडावी
इतकी ती सुंदर होती..
म्हणूनच की काय
वेळी अवेळी
रस्त्याने येता जाता
पाऊस तिची वाट अडवायचा
पावसाला चुकवून
ती घर गाठायची
पाऊस मागं मागं जाऊन
तिच्या घराच्या खिडकीसमोर
कोसळत राहायचा
तासन् तास…!’

ajay-devgn
भुताटकीच्या ‘त्या’ अनुभवांबद्दल अजय देवगणचा खुलासा; म्हणाला, “आम्ही जेव्हा…”
human elephant conflict in kerala
लेख : गळपट्टा घातला, तरी हत्ती गायब!
Angry husband danced in such a way that his wife would never forget for rest of her life
VIDEO: जबरदस्ती नाच म्हणाल्यामुळे नवरदेवाला आला राग, रागावलेल्या नवऱ्यानं केलं असं काही की…नेमकं काय घडलं?
pregnant woman in Miraj taluka
सांगली : अडलेल्या महिलेसाठी वाटही अडली

२. माझ्या हाती
नसती लेखणी
तर
तर असती छिन्नी
सतार, बासरी
अथवा कुंचला
मी कशानेही उपसतच राहिलो असतो
हा अतोनात कोलाहल मनातला!

३. मित्र
आम्ही दोघे मित्र
एकमेकांचे जिवलग
एकच ध्येय एकच स्वप्न घेऊन जगणारे
पुढे त्याने आत्महत्या केली
आणि मी कविता लिहिली

४. ओवणी
ओठांत कुठवर चिरडाव्यात
अंतरीच्या हाका
कवितेच्या सुईने किती
घालावा टाका
जखम चिघळते
घातलेल्याच टाक्यातून
आकाश कोण ओवतं
सुईच्या नाकातून

५. मुके पैंजण
एकटेपणाचे हे जीवघेने तट…
तू आता भराभर ढासळून टाक
पुन्हा कधीच न बांधण्यासाठी
फाटलेल्या आभाळाला
टाके घालून सांधण्यासाठी
कारण मी आता माझ्याकडचा रस्ता
झाडून पुसून साफ केलाय
तुझ्या पायातल्या
मुक्या पैंजणाला
मुक्त गाणी गाण्यासाठी