dilip thakurएकेकाळी चित्रपटाच्या जगात मुहूर्त म्हणजे जणू सण. हिंदीत तर ग्लॅमरची मस्तच रेलचेल असणारा सोहळा मराठीत मात्र केवढा तरी आपलेपणा; कौटुंबिक वातावरण, एकमेकांची जिव्हाळ्याने विचारपूस. ‘अशी असावी सासू’ (१९९६) या नावातच बरेच काही आपलेपण जाणवते. जयश्री गडकर यांचा हा यशस्वी चित्रपट! विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा-पटकथा, निर्मिती, दिग्दर्शन व मध्यवर्ती भूमिका या जबाबदाऱ्या त्यानीच पेलल्या. मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर कोल्हापूर येथे त्यांनी या चित्रपटाचा मुहूर्त आयोजिला होता. १९९० ची ही गोष्ट. तेव्हाच्या संथ अशा सामाजिक सांस्कृतिक लयीतच मराठी चित्रपट निर्माण होत. जयश्री गडकर यानी आपले एकेकाळचे नायक चंद्रकांत मांढरे यांच्या शुभ हस्ते या चित्रपटाच्या मुहूर्ताचे आयोजन करून नातेसंबंध जपले. बाळ धुरी यानी जयश्रीजींसोबत मुहूर्त दृश्यात सहभाग घेतला. सगळेच कसे मराठी चित्रपटाच्या परंपरा, मूल्य, सभ्यता, संस्कार यालाच साजेसे! पटकथेत जयश्री गडकर यांच्या जोडीला प्रताप गंगावणे होते. जगदीश खेबुडकर यांच्या गीताना बाळ पळसुले यांचे संगीत. चित्रपटात निळू फुले, पद्मा चव्हाण, मधु कांबीकर, अशोक शिंदे, विजय चव्हाण, राजशेखर, आशा पाटील यांच्यासह अंजली धारिया, प्राची मणेरिकर यांच्याही भूमिका. कोल्हापुरातील मराठी चित्रपटाच्या सेटवर तेव्हा कमालीचे खेळकर वातावरण असे. दुपारचे जेवण कलाकार कारागीर व कामगार असे सगळे एकत्र घेत. म्हणूनच तर पडद्यावरची भावनिक दृश्ये अधिकच प्रभावी ठरत…

Amruta Khanvilkar slam trollers
“तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे”, ट्रोलर्सवर संतापली अमृता खानविलकर; म्हणाली, “गप्प राहणं हे…”
How To Made Homemade Crispy Potato Wafers
१ किलो बटाटे वापरून घरच्याघरी बनवा खमंग ‘बटाटा वेफर्स’; ३ वर्ष खराब होणार नाहीत
insta facebook shaheed word ban
इन्स्टाग्राम, फेसबुकवर शहीद शब्द लिहिण्यावर बंदी? का झाला असा निर्णय?
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?