dilip-thakur-loksattaअष्टपैलू महेश कोठारे श्रीमती लता मंगेशकर यांच्या शुभ हस्ते ‘धडाकेबाज’ चित्रपटासाठीचा पुरस्कार स्वीकारत आहे. ‘छोटा जवान’ (१९६३) या चित्रपटापासून बाल-कलाकार म्हणून कारकिर्द सुरू करणाऱ्या महेशने कायद्याचे शिक्षण घेतले आणि मग तो सिनेमाच्या जगात असा काही मुरला की विचारू नका. त्याच्या कारकिर्दीचे हे एकावन्नावे वर्ष आहे. अभिनंदन! महेशने अभिनेता-निर्माता-दिग्दर्शक अशी ‘दे दणादण’ ‘धडाकेबाज’ वाटचाल केली. ‘खबरदार’ कोणी माझ्या वाटेत याल तर असा जणू त्याचा रोखठोक बाणा आहे. मराठीतून तो ‘लो मै आ गया’ करीत हिंदीतही झेपावला पण बरेचसे मराठी दिग्दर्शक एक-दोनच चित्रपटातच मराठीत परतले तसाच हादेखील ‘स्वगृही’ आला, त्याची कारकिर्द खूप मोठी. त्यातील महत्वाच्या क्षणाचे हे छायाचित्र.