‘गेम्स ऑफ थ्रोन्स’ मालिकेतील अभिनेत्री मेसी विलियम्सने तिचे टॉपलेस फोटो लीक करणा-यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. १९ वर्षीय विल्यम्सचे टॉपलेस फोटो इंटरनेटवर लीक करण्यात आले आहेत. हे फोटो सोशल मिडीयावरील तिच्या खासगी अकाउन्टवरून चोरी करण्यात आले आहेत.

अभिनेत्री मेसीने तिचे फोटो लीक करणा-यांना शीव देत चोख उत्तर दिले आहे. हे फोटो ती जपानला गेली  होती तेव्हाचे आहेत. विल्यम्सने ट्विटरवर ‘Yob, frast, nunt’ या शब्दांचा वापर केला आहे. या शिव्या असून सदर अभिनेत्रीने हे शब्द ‘इजी ए’ या चित्रपटातील एका दृश्यातून घेतल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे. लीक केलेल्या फोटोत मेसीने काळी बिकनी घातलेली असून ती डोंगरावर बसलेली दिसते. या फोटोत तिच्यासोबत तिची मैत्रिणदेखील आहे. काही फोटो समुद्रकिना-याजवळ काढण्यात आले आहेत. मेसीच्या प्रवक्त्याने हे फोटो खरे असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले. मेसी एका प्रोजेक्टच्या कामाच्या निमित्ताने जपान येथील टाइजी शहरात गेली होती. तिथे तिने डॉल्फिन पकडणे आणि त्यांना मारणे या विरुद्ध मोहीम राबविली होती. मेसी विल्यम्सला ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’मधील ‘आर्य स्टार्क’ या व्यक्तिरेखेसाठी ओळखले जाते.

अशा प्रकारचे फोटो लीक होणारी मेसी ही पहिली महिला सेलिब्रेटी नाही. याआधी जेनिफर लॉरेन्स, कॅले कुओको, केट अपटॉन यांचेही फोटो चोरून लीक करण्यात आले होते.

https://www.instagram.com/p/BHZ8xjRBgSW/

https://www.instagram.com/p/BJqiV4UBxGp/

https://www.instagram.com/p/BKcZeVsBhZb/

https://www.instagram.com/p/BKed4RPBTdi/

https://www.instagram.com/p/BNU7S6-hla2/