जेनेलिया आणि रितेश देशमुख यांनी १ जुनला आपल्या दुसऱ्या बाळाला ‘राहिल’ला जन्म दिला. राहिल कसा दिसतो याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असताना, जेनेलियाने नुकतंच त्याच्याबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात ती छोट्या राहिलबरोबर दिसत आहे. जेनेलियाने फक्त फोटोच शेअर केला असं नाही तर त्याखाली तिने एक सुंदर संदेशही लिहीला आहे.
लहान भावाच्या आगमनाची बातमीही रितेशने वेगळ्या पद्धतीने आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवली. रितेशने आपल्या चिमुकला रिआनचा फोटो ट्विट करून त्याच्या लहान भावाचे घरात आगमन झाल्याचे म्हटले. याशिवाय, माझी सगळी खेळणी आता त्याची होणार, असे म्हणत रिआन आपल्या लहान भावाचे स्वागत करत असल्याचेही रितेशने ट्विटमध्ये नमूद केले होते.
रितेश आणि जेनेलिया यांच्या प्रेमकहाणीला २००३ साली सुरूवात झाली होती, तर २०१२ साली दोघं विवाहबंधनात अडकले. २०१४ साली जेनेलियाने आपला पहिला मुलगा रिआनला जन्म दिला. त्यानंतर याच महिन्याच्या सुरूवातीला देशमुख कुटुंबात रिआनच्या लहान भावाचे आगमन झाले.

 

Special Something’s #mybabies #myboys #lovebeingamom #noreplacement #happiness

A photo posted by Genelia Deshmukh (@geneliad) on