मनीष पॉलला काय झालंय ते मसक्कलीला कळेनासं झालंय. एरवी तेरवी तो कॉमेडीचा बादशाह आहेच पण म्हणून चक्क विनोदी कपडे घालायचे!? नुकतंच त्याला एअरपोर्टवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बघितलं. तर हा पठ्ठय़ा काळा शर्ट, त्यावर काळे ‘ट्रान्सपरंट’ जॅकेट आणि त्यात पांढऱ्या रंगाचा गॉगल घालून उतरत होता. त्याचा हा अचकट विचकट अवतार बघून मसक्कलीला प्रश्नच पडला हा आता रणबीरच्या वाटेवर तर नाही ना?

‘सलमान का  सुरज निकल आया’ मसक्कलीचा फेवरेट खान,

सल्लु सध्या त्याच्या आवडत्या दिग्दर्शकासोबत काम करण्यासाठी तयार झालाय. मैंने प्यार किया, हम आपके है कोन, हम साथ साथ है आणि प्रेम रतन धन पायो नंतर आता तो सुरज बडजात्याच्या नव्या चित्रपटात काम करण्यासाठी सज्ज झालाय. या अभिनेता-दिग्दर्शकाच्या जोडीने केलेली जादू प्रेम रतन धन पायो या चित्रपटाच्या वेळेला चालली नाही पण ती लवकरच चालेल अशी चिन्ह दिसतायत!

 

मीराचं शॉर्टड्रेस प्रेम

ravi09बॉली इंडस्ट्रीतल्या सेलेब्सच्या फॅशन सेन्सवर मसक्कलीची बारीक नजर असते पण एक ललना तिच्या चक्क नजरेतच भरली. ही ललना दुसरी तिसरी कोणी नसुन आपल्या शाहीदची बायको मीरा आहे. तिला शॉर्ट ड्रेससची भारी आवड आहे म्हणे. मसक्कलीने तिला नुकतंच एका पार्टीमध्ये छान ब्लॅक कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये पाहीलं. त्यात ती इतकी सुंदर दिसत होती की विचारु नका! मसक्कली तर तिच्यावर फिदाच झाली. तिची जादू मसक्कलीवरुन उतरते न उतरतेच तेच मसक्कलीने तिला सकाळी नवरा शाहिदसोबत स्ट्राईप्स असलेल्या निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पाहिल. खरंच मीराचं हे शॉर्ट ड्रेस प्रेम घायाळ करणार आहे!

छोटया पडद्यावर पुनर्पदार्पण

मसक्कलीचे सल्ले एकल्यावर भल्या भल्यांना चांगले दिवस येतात. मग करण सिंग ग्रोवरला का नाही येणार? छोट्या पडद्यावरचा, त्यानंतर मोठ्या पडद्यावर आलेला करण आता मसक्कलीच्या सल्ल्यानुसार पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. पण यावेळी अभिनेता म्हणून नाही बरं का तर अँकर म्हणून तो झळकणार आहे. नच बलिये सिझन 8 साठी करणची होस्ट म्हणून निवड झालीये. मसक्कलीने करणला सांगितलेच होते छोटा पडदा तर छोटा पण जे मिळतं त्यात माणसाने समाधान मानाव!

एक्स आणि नवरा जेव्हा एकत्र येतात..

ravi13आपला एक्स बॉयफ्रेंड आणि नवरा समोरासमोर येतात. इतकंच नाही तर एकमेकांची स्तुतीही करतात हा क्षण अनुभवताना काय होत असेल ते बिच्चाऱ्या करीनालाच ठाऊक. तिला स्वप्नातही वाटलं नसेल की तिचा एक्स आणि नवरा एकत्र येतील. पण विशाल भारद्वाजने ही किमया करून दाखवली आणि तिला चांगलंच पेचात अडकवलं. ‘रंगून’च्या निमित्ताने शाहिद आणि सैफ एकमेकांसोबत अभिनय करण्यासाठी एकत्र आले आणि एकमेकांचे चांगले मित्रही झाले. इतकेच नव्हे तर शाहिदने सैफची खास स्तुतीही केली. सैफ किती कूल आणि मनमिळाऊ आहे. तो एक चांगला अभिनेता आहे अशी एकना अनेक स्तुतिसुमने शाहिद उधळत होता. ravi14मसक्कलीने करीनाला विचारल्यावर तिने मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवणे पसंत केले.

‘सोने पे सुहागा’

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा ही म्हण तुम्ही एकली असेलच. असंच काहीसं सध्या सिद्धार्थचं झालंय आणि त्यात फवादचा मात्र बळी गेलाय. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आल्याने सलमान खानची निर्मिती असलेल्या नव्या चित्रपटात फवादच्या जागी सिद्धार्थची वर्णी लागली आहे. मेंटोर करण जोहरने फवादच्या जागी सिद्धार्थचं नाव सुचवल्यानं सिद्धार्थसाठी ही संधी ‘सोने पे सुहागा’ ठरणार आहे.

– मसक्कली