सध्याच्या घडीला चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी हा सर्वात महत्त्वाचा भाग समजला जातो. प्रदर्शनापूर्वी जवळपास दोन ते तीन महिन्यांपूर्वी चित्रपटांच्या प्रसिद्धीला सुरुवात करण्यात येते. पण, आगामी ‘गोलमाल अगेन’ चित्रपट याला अपवाद ठरत आहे. २० ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक २१ सप्टेंबरला प्रदर्शित करण्यात आला. तर प्रदर्शनाला केवळ एकच महिना बाकी असताना २२ सप्टेंबरला निर्मात्यांनी पहिला ट्रेलर प्रदर्शित केला. त्यामुळे आता संपूर्ण टीमला पूर्ण जोर लावून चित्रपटाची प्रसिद्धी करण्याची गरज आहे. ही गरज ओळखूनच विनोदीपट असलेल्या ‘गोलमाल अगेन’च्या निर्मात्यांनी काही खास योजना आखल्या आहेत.

वाचा : रणवीर सिंग साकारणार कपिल देव यांची भूमिका

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गोलमाल अगेन’ची भारताबाहेर जोरदार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या संपूर्ण मोहिमेची जबाबदारी रिलायन्स एण्टरटेनमेन्टचे विपणन प्रमुख समीर चोप्रा सांभाळतील. या चित्रपटाच्या प्रिंट आणि जाहिरातीचा संपूर्ण खर्च १५ कोटी रुपये असून, भारताबाहेरील प्रसिद्धीवर तब्बल पाच कोटी रुपये खर्च करण्यात येतील.

वाचा : अभिषेकचा ‘या’ बहुचर्चित चित्रपटातून काढता पाय!

‘गोलमाल’ सीरिजमधील ‘गोलमाल अगेन’ हा चौथा चित्रपट आहे. २००६ साली प्रदर्शित झालेल्या पहिल्या ‘गोलमाल’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आलेल्या ‘गोलमाल रिटर्न्स’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. ततर ‘गोलमाल ३’ हा अजय देवगणचा १०० कोटी क्लबमधील पहिला चित्रपट ठरलेल. ‘गोलमाल अगेन’मध्ये अजय देवगणसह परिणीती चोप्रा, तब्बू, अर्षद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू, नील नितीन मुकेश आणि श्रेयस तळपदे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.