लहान मुलांचे भावविश्व आजवर अनेक सिनेमांमधून आपापल्या परीने उलगडण्याचा अनेक दिग्दर्शकांनी प्रयत्न केला. असे असले तरी या भावविश्वातील असे अनेक पैलू आहेत जे आजवर कधीच जगासमोर आलेले नाहीत. पण आजवर प्रकाश झोतात न आलेले पैलू प्रेक्षकांसमोर घेऊन येणारा ‘गोप्या’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गणेश फिल्म्स अॅण्ड एण्टरटेन्मेन्टच्या बॅनरखाली अमोल भालेराव, नितिन पगारे आणि राज पैठणकर यांनी ‘गोप्या’ची निर्मिती केली आहे. तर राज पैठणकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

व्यसनाच्या आहारी गेलेला पिता आणि संसाराचं रहाट गाडं ओढण्यासाठी मोलमजुरी करणारी माता यांच्या पोटी जन्मलेल्या गोपी नावाच्या मुलाभोवती या सिनेमाचे कथानक गुंफते. शिकण्याची तीव्र इच्छा पण घरी अठरा विश्व दारिद्रय, यातून गोपी कशा प्रकारे आपली वाटचाल करतो याचे चित्रण ‘गोप्या’मध्ये करण्यात आले आहे. आदित्य पैठणकर हा गोप्याच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत माधवी जुवेकर, कमलेश सावंत, मनीषा पैठणकर, मानसी मुरूडकर, उदय सबनीस, अजय जाधव, समीर विजयन, राजेश भोसले, प्रकाश धोत्रे, अमीर तडवळकर, निवास मोरे, जयवंत वाडकर आदी कलावंतांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता
loksatta analysis india fights somali pirates indian navy rescues ship from somali pirate attack
विश्लेषण: हुथींपाठोपाठ आता सोमाली चाच्यांचा उच्छाद… भारतीय नौदलाची भूमिका कशी ठरणार निर्णायक?

योगेश सबनीस यांनी ‘गोप्या’साठी संवादलेखन केले असून, पटकथा योगेश महाजन यांची आहे. छायालेखक अनिकेत के. यांनी केले आहे. दिग्दर्शक राज पैठणकर यांनीच या सिनेमासाठी गीतरचना आणि कथा लिहिली आहे. संगीतकार किरण-राज या जोडीने या सिनेमाला संगीत दिले आहे. डॉ. नेहा राजपाल, किरण पैठणकर आणि बालगायक रोहित वाघ यांनी या सिनेमातील गाणी गायली आहेत. देवदत्त राऊत आणि नंदू मोहरकर हे या सिनेमाचे कला दिग्दर्शक असून, अतुल साळवे हे निर्मिती व्यवस्थापक आहेत. संकलन विशाल कोटकर आणि सोनू पैठणकर यांनी केले आहे.

केवळ मुलांच्या मानसिकतेवर चित्रपट काढण्यापेक्षा समाजात जे ज्वलंत चित्र आज पाहायला मिळते त्याचे वास्तववादी चित्रण ‘गोप्या’ चित्रपटाद्वारे केले असून कलाकार-तंत्रज्ञांची चांगली भट्टी जमल्याने एक दर्जेदार आशयघन कलाकृती रसिक दरबारी सादर करण्याचा प्रयत्न असल्याचे दिग्दर्शक राजपैठणकर यांनी सांगितले.