नाव गजब, दिसणं तर त्याहूनही गजब असणारी हॉलीवूडची पॉपस्टार लेडी गागा ही नेहमी तिच्या नवनव्या अवतारासाठी (गेट अप) चर्चेत असते. एरव्ही कोणीही असे कपडे घालणार नाही किंवा असा मेकप करण्याची हिंमत करणार नाही, असा तिचा अवतार असतो. आता पुन्हा एकदा ती यामुळेच चर्चेचा विषय बनली आहे. आज झालेल्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात लेडी गागाला वॉर्डरोब मालफंक्शनला सामोरे जावे लागले. गागाने पुरस्कार सोहळ्यासाठी ब्रॅण्डॉन मॅक्सवेल गाऊन परिधान केला होता. रेड कार्पेटवरून जात असताना तिच्यावर मालफंक्शनची नामुष्की ओढावली. मात्र, परिस्थिती सांभाळत टॉनी बेनेटसोबत सादरीकरणाच्या तयारीसाठी ती मंचामागे गेली. या दोघांना ‘चीक टू चीक’ या अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट पारंपारिक पॉप व्होकलचा पुरस्कारही मिळाला.