हॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आणि ‘बॉण्ड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी हॅली बेरी तिचे आयुष्य अगदी बिनधास्तपणे जगते. लवकरच तिचा ‘द किंग्समॅनः द गोल्डन सर्कल’ हा चित्रपटही आज सर्वत्र प्रदर्शित झाला. पण, ही अभिनेत्री आगामी चित्रपटामुळे नव्हे तर तिच्या प्रेमप्रकरणामुळे आता चर्चेत आली आहे.

वाचा : ४८व्या वर्षीही सुपरफिट असलेल्या भाग्यश्रीच्या ग्लॅमरस लाइफचे फोटो

५१ वर्षीय हॅलीला तिचे प्रेम मिळाले आहे. सध्या ती ३५ वर्षीय संगीत दिग्दर्शक अॅलेक्स डा किड याला डेट करतेय. काही दिवसांपूर्वीच हे दोघंही एकत्र दिसले. त्यांच्या या आउटिंगनंतर लगेचच हॅलीने त्यांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. तिने फोटोला दिलेल्या ‘माय बॅलन्स’ या कॅप्शनमुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या.

https://www.instagram.com/p/BZO10_hgPSR/

अभिनेता ऑलिवियर मार्टिनिज याच्यापासून २०१५ साली विभक्त झाल्यानंतर हॅली पुन्हा एकदा प्रेमात पडलीय. डिसेंबर २०१६ला हॅली आणि मार्टिनिजचा घटस्फोट झाला. त्यांना तीन वर्षांचा मुलगा असून, तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर गॅब्रियल याच्यापासून तिला नऊ वर्षांची मुलगी आहे.

वाचा : सिद्धार्थ मल्होत्रा साकारणार कारगिलमध्ये शहीद झालेल्या ‘या’ लष्करी अधिकाऱ्याची भूमिका?

२००१ साली हॅलीला ‘मॉन्स्टर्स बॉल’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. याशिवाय, ‘एक्स मॅन’च्या सीरिजमधील चित्रपटांमध्येही तिने आपले अभिनय कौशल्य सिद्ध करून दाखवले.