आजच्या घडीला संगीत क्षेत्रावर राज्य करणाऱ्या गायकांमध्ये अरिजित सिंग हे नाव आघाडीवर आहे. आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायकाने २००५ साली आलेल्या ‘फेम गुरुकुल’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतलेला. अंतिम फेरी गाठणाऱ्या अरिजितला तेव्हा अपयश आले होते. त्यानंतर ‘१० के १० ले गए दिल’ शोमध्ये त्याने बाजी मारली आणि संगीत क्षेत्रातील त्याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. एखाद्या शोचे विजेतेपद मिळाल्यानंतर ती व्यक्ती नंतर कुठेतरी गायब होऊन जाते. पण, अरिजित या सगळ्यांमध्ये खूप वेगळा असल्याचे त्याने पदोपदी दाखवून दिले. रिअॅलिटी शो जिंकल्यानंतर त्याने स्वतःचा रेकॉर्डिंग सेटअप सुरु करत म्युझिक प्रोग्राम करण्यास सुरुवात केली.

‘आशिकी २’ मधील ‘तुम ही हो’ गाण्याने अरिजितला प्रसिद्धी दिली. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या या गायकाच्या गाण्यांशिवाय कोणाचीच प्ले लिस्ट पूर्ण होत नसेल. ‘फिर ले आया दिल’, ‘हमदर्द’, ‘फिर मोहब्बत’, ‘कबिरा’, ‘मुस्कुराने की वजह तुम हो’ यासारखी एक से बढकर एक गाणी त्याने गायली आहेत. आवाजाचा बादशहा असणाऱ्या अरिजितची बरेचजण गायक आतिफ असलमशी तुलना करतात. पण, आपल्या प्रतिस्पर्धी गायकांपेक्षा आपण एक पाऊल पुढे असल्याचे अरिजित त्याच्या गाण्यांमधून सिद्ध करतो. विशेष म्हणजे तो इतर गायकांनी गायलेली गाणीही रिक्रिएट करून आपल्या विशिष्ट अंदाजात गातो. ‘हर किसी को नही मिलता’, ‘दिल से’, ‘दिल चाहता है’, ‘लग जा गले’ या गाण्यांना त्याने रिक्रिएट करून लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायले आहे. त्याच्या या रिक्रिएट गाण्यांनाही रसिकांची पसंती मिळाली आहे.

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
cat
दुबईमध्ये पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या मांजरीची जीव वाचवण्यासाठी धडपड! कारच्या दरवाजाला लटकणाऱ्या मांजरीचा थरारक Video Viral
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
Video: Youth Thrown By Friends In Holika Dahan Ashes
मित्रच जिवावर उठले! तरूणाला ५ जणांनी पकडून होळीच्या आगीत फेकलं, घटनेचा थरारक VIDEO समोर

अरिजितने गायलेली १० प्रसिद्ध गाणी

तुम ही हो (आशिकी २)

फिर मोहब्बत करने चला .. ( मर्डर २ )

मुस्कुराने की वजह तुम हो.. (सिटीलाइट्स)

हमदर्द (एक व्हिलन)

समझावा (हम्प्टी शर्मा की दुल्हनिया)

कबिरा (ये जवानी है दिवानी)

मस्त मगन.. (२ स्टेट्स)

हर किसी को नही मिला.. (बॉस)

आज फिर…. (हेट स्टोरी २)

कभी जो बादल बरसे.. (जॅकपॉट)