बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना ९३ व्या (११ डिसेंबर) वाढदिवसानिमित्त चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यात प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर, अभिनेता ऋषि कपूर, अमिताभ बच्चन, गीतकार जावेद अख्तर आणि दिग्दर्शक सुभाष घई यांच्याही नावांचा समावेश आहे. ‘आन’, ‘दाग’, ‘देवदास’, ‘मधुमती’, ‘पैगाम’, ‘मुगल-ए-आझम’, ‘राम और श्याम’ आणि ‘लीडर’ यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले दिलीप कुमार यांना चित्रपटसृष्टीत ‘यूसुफ खान’ या नावानेही ओळखले जाते. जवळपास सहा दशकं चित्रटपसृष्टीत काम केल्यानंतर दिलीप यांनी १९९८ साली निवृत्ती घेतली. त्यांनी ‘किला’ या चित्रपटात शेवटचा अभिनय केला.

बॉलीवूडचे ‘शो मॅन’ राज कपूर आणि ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार हे बालपणापासून मित्र होते. या दोघांचेही कुटुंब पेशावर येथे राहणारे होते. या दोघांच्याही कुटुंबांमध्येही जवळचे संबंध होते. राज कपूर यांचे वडिल पृथ्वीराज कपूर हे सर्वात आधी मुंबईला आले होते. त्यानंतर दिलीप कुमार यांचे वडिल लाला गुलाम सरवर हे आपल्या कुटुंबाला घेऊन मुंबईला आले. दिलीप कुमार यांनी आपल्या आत्मकथेत एक किस्सा सांगितला आहे. त्यात त्यांनी म्हटलेय की, महाविद्यालयात शिकणा-या एका मुलीला माझ्याशी मैत्री करायची आहे, असे राज कपूरने मला एकदा सांगितले. त्याने दूर उभी असलेल्या एका मुलीकडे हाताने इशाराही केला. त्या मुलीकडे जाऊन त्याने मला बोलण्यास सांगितले. मात्र, तिच्या आजूबाजूला असलेल्या मुलामुलींना पाहून माझी पुढे जाण्याची हिंमत झाली नाही.

Arvind Kejriwal
अरविंद केजरीवालांची शुगर लेव्हल ३२० वर, अखेर तुरुंगात पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन
Kiran Mane post For Vasant More
अभिनेता किरण मानेची पोस्ट चर्चेत, “वसंत मोरेंना सलाम, पण मत रवींद्र धंगेकरांनाच, कारण..”
Rohit Pawar Post Against Raj Thackeray
“तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक’ असं..”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यावर रोहित पवारांची पोस्ट
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”

‘ट्रॅजेडी किंग’ ही उपाधी लागलेल्या दिलीपकुमार यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला ‘ज्वार भाटा’ (१९४४) पासून सुरुवात केली. अंदाज (१९४९), दीदार (१९५१), आन (१९५२), देवदास (१९५५), मुगल-ए-आझम (१९६०), गंगा जमना (१९६१), मधुमती (१९५८), राम और श्याम (१९६७), आदमी (१९६८), गोपी (१९७०), बैराग (१९७६), शक्ती (१९८२) यासारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट. अभिनयासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी आठ वेळा पटकावला. केंद्र सरकारने १९९४ साली त्यांना चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि अतुलनीय कारकिर्दीबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित केले. १९९८ मध्ये पाकिस्तान सरकारने त्यांना ‘निशान-ए-पाकिस्तान’ हा पुरस्कार बहाल केला.

बॉलीवूड जगतातून दिलीप कुमार यांना कोणी कोणी शुभेच्छा दिल्या आहेत ते पाहूया..