अभिनेता अनिल कपूर याची तिनही मुले आता त्यांच्या करिअरमध्ये मार्गाला लागली आहेत. अनिल कपूरला सोनम, रिह्या आणि हर्षवर्धन ही तीन मुले आहेत. सोनमने बॉलीवूडमध्ये स्टाइल दीवा म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. तर रिह्या ही डिझाइनर आहे. लवकरचं हर्षवर्धनचाही चित्रपट येत असून तो बॉलीवूडमध्ये पदार्पण करतोय. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या मिर्झीया या चित्रपटात सैयमी खेर हिच्यासोबत तो झळकणार आहे. त्याचसोबत त्याने आपल्या दुस-या चित्रपटाच्या कामासही सुरुवात केल्याचे कळते.
दरम्यान, हर्षवर्धनने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत अनिल कपूर त्याच्या बाजूला सोनम , त्याची पत्नी सुनिता आणि रिह्या दिसते. हर्षवर्धनने या फोटोस ‘कुटुंब माझ्या दृष्टिकोनातून’ असे कॅप्नश दिले आहे. या फोटोत हर्षवर्धनचाही समावेश आहे. मात्र, फोटोत तो पूर्ण न दिसता केवळ त्याचे पाय त्यात आले आहेत. हर्षवर्धनने शेअर केलेल्या फोटोत सर्वांचे हसरे चेहरे पाहून सुखी कुटुंबाचे चित्र असेच असावे हे दिसते. अशा प्रकारचे फोटो फार कमी वेळा पाहावयास मिळतात.

The family from my perspective @sonamkapoor @rheakapoor @kapoor.sunita @anilskapoor #family

A photo posted by Harshvardhan Kapoor (@harshvardhankapoor) on