ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांनी गुरूवारी दीपिकाला साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्याने अनेकजणांना आश्चर्याचा धक्का बसला. दीपिका तुला साखरपुड्याच्या शुभेच्छा. तुम्हा दोघांना उज्ज्वल भविष्य, आनंद आणि सुखी जीवन प्राप्त होवो, अशी मी देवाकडे प्रार्थना करते, अशा आशयाचे ट्विट हेमामालिनी केले होते. सुरूवातीला अनेकांना हेमामालिनी दीपिका पदुकोणला शुभेच्छा देत असल्याचे वाटले. दीपिका सध्या टोरान्टोमध्ये XXX: Return of Xander Cage या हॉलिवूडपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. त्यामुळे दीपिकाने परदेशात कधी आणि कुणाशी साखरपुडा केला, या प्रश्नाने चाहत्यांना भंडावून सोडले होते. मात्र, थोड्याचवेळात हेमामालिनी यासंदर्भातील खुलासा करत ती दीपिका पदुकोण नसल्याचे सांगितले. ही दीपिका म्हणजे माझी ट्विटरवरील फॉलोअर असल्याचे हेमामालिनी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हेमामालिनी यांच्या या स्पष्टीकरणामुळे तुर्तास तरी दीपिकाच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. Deepika, All good wishes on ur engagement! Pray God both of u have a bright future, happiness & joy in ur life together — Hema Malini (@dreamgirlhema) April 28, 2016 No no! This is Deepika who is following me on Twitter! Not Ms Padukone! — Hema Malini (@dreamgirlhema) April 28, 2016