‘बेफिक्रे’ या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासूनच या चित्रपटासंबंधीच्या अनेक चर्चा बॉलिवूडमध्ये रंगताना पाहायला मिळाल्या. चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांनीही प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. त्यामुळे अभिनेता रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या धम्माल केमिस्ट्रीचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे ही आहेत ‘बेफिक्रे’ हा चित्रपट का पाहावा याची पाच कारणे.

आदित्य चोप्रांचे ‘बेफिक्रे’ पुनरागमन- बॉलिवूडमध्ये प्रेमाची परिभाषा नव्याने प्रेक्षकांसमोर मांडणाऱ्या काही दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे आदित्य चोप्रा. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’पासून अगदी ‘रब ने बना दी जोडी’ पर्यंतच्या सर्वच चित्रपटातून प्रेमालाच प्रतकाशझोतात आणणारा आदित्य चोप्रा या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन करत आहे. गेला बराच काळ दिग्दर्शन क्षेत्रापासूनन दूर राहिलेले आदित्य चोप्रा एका नव्या धाटणीच्या कथानकासह प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

drishyam-hollywood-remake
‘दृश्यम’बद्दल मोठी अपडेट समोर; कोरीअन रिमेकनंतर आता चित्रपटाचा बनणार आता हॉलिवूडमध्ये रिमेक
randeep hooda swatantrya veer movie clip video features on times square
रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचा व्हिडिओ झळकला न्यूयॉर्क ‘टाईम्स स्क्वेअर’ वर
Taapsee Pannu reacts on wedding with Mathias Boe
तापसी पन्नू विदेशी बॉयफ्रेंडशी मार्चमध्ये लग्न करणार? अभिनेत्रीने चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”
actor shreyas talpade debut in south indian movie
बॉलीवूड गाजवल्यानंतर आता मराठमोळा श्रेयस तळपदे करणार दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण, म्हणाला…

सिटी ऑफ लव्ह, पॅरिसची विहंगम दृश्ये- तीन ते चार महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरात सिटी ऑफ लव्ह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅरिसमधील काही नयनरम्य ठिकाणांवर चित्रीत केलेली दृश्ये या चित्रपटाद्वारे पाहता येणार आहेत. त्यामुळे वाणी-रणवीरच्या प्रेमावर या सिटी ऑफ लव्ह ची जादू होणार का?

अफलातून केमिस्ट्री- या चित्रपटामध्ये रणवीर आणि वाणी यांच्यावर बेसुमार चुंबनदृश्यांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. तब्बल २३ वेळा रणवीर सिंग आणि वाणी कपूर या चित्रपटामध्ये एकमेकांचे चुंबन घेताना दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही या दोघांचीही केमिस्ट्री अनेकांच्याच चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळे चित्रपटामध्ये या दोन्ही कलाकारांची अफलातून केमिस्ट्री पाहायला मिळणार हे नक्की.

फ्रेंच पगडा- या चित्रपटाचे कथानक आणि पात्र पाहता फ्रेंच संवाद आणि शब्दांचा या चित्रपटावरक पगडा आहे. त्यामुळे चित्रपटातून काही सोपे फ्रेंच शब्द नक्कीच तुमच्यासाठी उपयोगाचे ठरतील. या चित्रपटासाठी वाणी आणि रणवीरने फ्रेंच भाषेचा रितसर अभ्यास केला होता. चित्रपटाच्या टिझर आणि ट्रेलरमधून वाणी कपूरच्या फ्रेंच ‘वाणी’ची झलकही पाहायला मिळाली आहेच.

चौकटीबाहेरचे कथानक आणि नवी जोडी-कौटुंबिक जिव्हाळा, प्रेम, परंपरा अशा सर्व विषयांपलीकडे जात ‘नो कमिटमेंट, नो अटॅचमेंट’ या नव्या सुत्रासह आदित्य चोप्रा एका चौकटीबाहेरच्या कथानकाला हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रेम आणि आकर्षण नसतानाही वाणी आणि रणवीरची ही ऑनस्क्रिन केमिस्ट्री चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवणार का हे लवकरच समजेल. तुर्तास हा चित्रपट पाहण्याचे आणखी एक कारण म्हणजे अभिनेत्री वाणी कपूर आणि अभिनेता रणवीर सिंगच्या रुपाने एक नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटामध्ये रणवीर एका ‘स्टँडअप कॉमेडियन’च्या भूमिकेमध्ये दिसणार आहे, तर वाणी एका ‘टुरिस्ट गाईड’च्या भूमिकेत झळकणार आहे.
या चित्रपटातील गाणी, पॅरिसचे विहंगम दृश्य, रणवीर वाणीची केमिस्ट्री आणि त्यांच्या ऑनस्क्रिन जोडीबद्दल आणखीन जाणून घेण्यासाठी सगळ्या चिंता दूर सारत पाहा ‘बेफिक्रे’.