येत्या २४ तारखेला प्रदर्शित होत असलेल्या विशाल भारद्वाज यांच्या ‘रंगून’ चित्रपटात कंगना रणौत प्रमुख भूमिकेत आहे. तिला मिळालेला हा पहिलाच बिग बजेट, बिग बॅनर चित्रपट. यात ती ज्यूलियाची भूमिका साकारत आहे. कंगना साकारत असलेली ही व्यक्तिरेखा फिअरलेस नाडिया हिच्यावर आधारित असल्याचे म्हटले जातेय. ती तिच्या बहारदार नृत्यासाठी, अ‍ॅक्शन्ससाठी प्रसिद्ध होतीच. शिवाय तिला चाबूकवाली म्हणूनही ओळखलं जायचं. १९३० आणि ४० च्या दशकात प्रसिद्ध असलेली फिअरलेस नाडिया होती तरी कोण? तिच्याबद्दल जाणून घेऊया.

जे बी एच आणि होमी वाडिया यांनी १९३० साली वाडिया मुव्हिटोन स्टुडिओची स्थापना केली होती. त्यांनीच ‘स्टंट क्वीन’ असलेल्या फिअरलेस नाडियाला लाँच केले होते. त्या काळी फिअरलेस नाडिया म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाडियाचं खरं नाव  ‘मेरी इवान्स’ असं होतं. मूळची ऑस्ट्रेलियन असलेल्या नाडियाने भारतात अनेक अॅक्शन चित्रपट केले आणि अल्पावधीतच ती स्टार बनली.

how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ

नाडियाच्या एकाही चित्रपटाची डीव्हीडी सध्या उपलब्ध नाही. पण जे बी एच वाडिया यांचे नातू रियाद विन्सी वाडिया यांनी तिच्यावर १९९३ साली एक सुंदर माहितीपट बनवला होता. याचे नाव फिअरलेस : द हंटरवाली स्टोरी असे आहे. यात नाडियाच्या काही छायाचित्र आणि व्हिडिओंच्या माध्यमातून तिचे आयुष्य आणि करिअर दाखविण्यात आले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील फिअरलेस नाडिया ही एक दिग्गज अभिनेत्री होती. नाडिया लहान असतानाच तिच्या आई-वडिलांसह भारतात आली होती. तिचे वडील ब्रिटीश आर्मीमध्ये सैनिक होते. पेशावरमध्ये मोठी झालेली नाडिया तेथेच घोडेस्वारी शिकली. पहिल्या महायुद्धात तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ती आणि तिची आई मुंबईत स्थलांतरित झाली. त्यानंतर उत्तम नोकरी मिळावी याकरिता मेरीने (नाडिया) शॉर्टहॅण्ड टायपिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी जाड असलेल्या मेरीने वजन कमी करण्याचाही निर्णय घेतला होता, असे तिच्या माहितीपटात दाखविण्यात आलेले आहे. त्यासाठी तिने रशियन नृत्य प्रशिक्षक मदाम अस्त्रोवा यांच्या नृत्यकला शाळेत नाव नोंदवले. त्यावेळी मदामनेच मेरीमध्ये असलेले कलागुण जाणले आणि भारतभर फिरण्या-या त्याच्या नृत्य/थेटर ट्रुपमध्ये तिला सहभागी करून  घेतले. त्याच्याच सांगण्यावरून तिने आपले नाव मेरीवरून नाडिया असे ठेवले होते.

photo-1-e1487773741947

नाडियाने नंतर एका रशियन सर्कससाठी ट्रुप सोडली. पण, त्यानंतर ती पुन्हा नृत्य, रंगमंच आणि हिंदी गाण्यांकडे वळली. थेटर मॅनेजरने तिची ओळख जे बी एच आणि होमी नाडिया यांच्याशी करून दिली. त्यावेळी होमी भावंडांनी ‘ती चित्रपटात काय कौशल्य दाखवणार’ असा प्रश्न केला. तेव्हा, मी निदान प्रयत्न तरी करेन, असे उत्तर तिने दिले. भारतीय प्रेक्षकांकडून नाडियाला कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहण्यासाठी जे बी एचने  तिला ‘देश दीपक’ या चित्रपटात दासीची भूमिका दिली. प्रेक्षकांकडून तिला खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याने जे बी एचने नंतर तिला ‘नूर-ए-यमन’ या चित्रपटात राजकुमारी पारिझादची भूमिका दिली.

नारीशक्ती आणि त्या कोणाच्याही गुलाम नाहीत हे जे बी एच यांना चित्रपटांच्या माध्यमातून दाखवायचे होते. असे स्त्रीपात्र साकारण्याची क्षमता त्यांना सशक्त आणि दणकट अशा नाडियाद दिसली. १९३५ साली त्यांनी ‘नाडिया : हंटरवाली’ (हे टोपणनाव आयुष्यभरासाठी तिच्या नावासोबत जोडले गेले.) या हिंदी चित्रपटाचा स्क्रिनप्ले ठेवला. अमेझोनिअन शरीरयष्टी, गौरवर्ण, निळे डोळे आणि त्यावर काळ्या रंगाचे मास्क, तलवार अशा लूकमध्ये असणारी ही आनंदी अशी नायिका स्वतःचे स्टंट स्वतःच करायची. प्रेक्षकांवरही तिची भुरळ पडली होती. हंटरवाली तेव्हा हिट झाला होता. त्यानंतर ३० ते ५० च्या दशकात तिने ‘मिस फ्रन्टीअर मेल’, ‘डायमंड क्वीन’ आणि ‘जंगल प्रिन्सेस’ यांसारख्या अॅक्शनपटांमध्ये काम केले. सहसा ती रॉबिन हूड सारख्या भूमिका साकारायची. पीडित लोकांची सुटका करणे यांसारख्या भूमिका ती साकारायची. चालत्या ट्रेनच्या छतावर शत्रूशी तिने दोन हात केल्याचे दृश्य तर तिच्या प्रसिद्ध दृश्यांपैकी एक होते. ब-याचदा ती जीममध्ये दिसायची. त्यामुळेच त्यावेळी शरीरयष्टीकडे अधिकाधिक लक्ष देण्याची क्रेझही सुरु झाली होती.

नाडिया आणि होमी हे जवळपास ४० च्या दशकात एकमेकांच्या प्रेमात पडले. पण, त्यांनी १९६१ साली लग्न करून आपले नाते अधिकृत केले. १९६८ साली प्रदर्शित झालेल्या ‘खिलाडी’ चित्रपटातून नाडिया अखेरची रुपेरी पडद्यावर दिसली.  त्यानंतर तिने आपल्या निवृत्तीचा आनंद घेत घोड्यांचे संगोपन करण्याकडे लक्ष दिले. १९५५ साली वयाच्या ८७ व्या वर्षी नाडियाने अखेरचा श्वास घेतला.