संगीतरकार, गायक आणि अभिनेता हिमेश रेशमिया आपल्या पत्नी कोमल हिला घटस्फोट देणार आहे. कोमल आणि हिमेश या दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही वांद्रे येथील न्यायालयात मंगळवारी घटस्फोटासाठीचा अर्ज भरला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघंही गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळे राहत आहेत.

एका वर्तमानपत्राशी बोलताना तो म्हणाला की, त्या दोघांनी या पुढे वेगवेगळे आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यांच्या या निर्णयाला दोन्ही कुटुंबांची सहमतीही आहे. कोमलनेही सांगितले की, हा निर्णय आमच्यापैकी कोणा एकाचा नसून दोघांचाही आहे. घटस्फोटानंतरही आम्ही दोघं एकमेकांच्या जीवनाचा हिस्सा बनून राहू.

या दोघांना एक मुलगाही आहे. स्वयं असे त्यांच्या मुलाचे नाव आहे. हिमेशचे अभिनेत्री सोनिया कपूरसोबत अफेअर सुरु आहे, ज्यामुळे त्याच्या वैवाहिक आयुष्यात सतत खटके उडत होते. २००६ मध्येही सोनियामुळेच हिमेश चर्चेत आला होता. पण आतापर्यंत त्यांच्या अफेअरची अधिकृत माहिती आलेली नाही. हिमेशचा म्युझिकल अल्बम नुकताच प्रदर्शित झाला आहे. या अल्बममध्ये हिमेश सलमानची कथित प्रेयसी लुलिया वंतुरसोबत गाणे गाताना दिसत आहे.

या अल्बमच्या प्रदर्शनावेळी बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चनही उपस्थित होते. सलमान आणि लुलिया हे अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. पण काही दिवसांपूर्वी लुलियाने तिचे आणि सलमानचे संबंध हे मित्रत्वाचे आहे. याहून जास्त त्या दोघांमध्ये काहीच नाही.