‘झाँसी कि रानी’ मालिकेतील छोट्या लक्ष्मीबाईच्या व्यक्तिरेखेने प्रचंड लोकप्रियता लाभलेली अभिनेत्री उल्का गुप्ता आगामी ‘ओढ’ सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘सोनाली एंटरटेनमेंट हाऊस’ निर्मित, ‘जी. एस. फिल्मस अकादमी प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘ओढ.. द अॅट्रॅक्शन’ या मराठी सिनेमाची निर्मिती एस. आर. तोवर यांनी केली असून दिग्दर्शन दिनेश ठाकूर करीत आहेत.

मैत्रीला वयाचे बंधन नसते पण समवयस्कर मुलगा आणि मुलगी यांच्यातही निखळ मैत्री असू शकते यावर समाजाचा विश्वास बसत नाही. अशाच एका निर्मळ मैत्रीची कथा ‘ओढ’ या सिनेमामधून उलगडणार आहे. मोहन जोशी, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, शशिकांत केतकर, जयवंत भालेकर सारख्या अनुभवी कलाकारांसोबत काम करण्यासाठी उल्का उत्साही आहे. या सिनेमाचे चित्रीकरण लातूर, तुळजापूर, ताकविकी परिसरात सुरु आहे. उल्कासोबत गणेश तोवर हा नवोदित अभिनेता या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या सिनेमात मोहन जोशींच्या मुलीच्या भूमिकेत आपल्याला उल्का पाहायला मिळणार आहे. याआधी तिने हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमातही काम केलं आहे. तेलगु, तामिळ, हिंदी, इंग्रजी भाषांवर प्रभुत्व असणारी उल्का गुप्ता सध्या मराठी भाषेचे धडे गिरवीत असून मराठी वाचनाचाही ती सराव करत आहे.

Marathi dancer ashish patil will work with Sanjay Leela Bhansali
‘या’ मराठमोळ्या नृत्यदिग्दर्शकाला मिळाली संजय लीला भन्साळींबरोबर काम करण्याची संधी; म्हणाला, “माझे अश्रू अनावर…”
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
maharani 3 ott series directed by marathi director saurabh bhave
बिहारचं राजकारण, सेटवरची मराठमोळी बांधिलकी ते बॉलीवूडचा अनुभव! ‘महाराणी’च्या जगात पाऊल टाकणारा मराठी दिग्दर्शक

‘ओढ’ सिनेमाची कथा- पटकथा दिग्दर्शक दिनेश ठाकूर यांचीच असून संवाद गणेश कदम यांनी लिहिले आहेत. सिनेमातील गीते अभय इनामदार, संजाली रोडे, कुकू प्रभास, कौस्तुभ यांनी लिहिली असून त्यांना संगीत प्रवीण कुंवर यांनी दिलं आहे. ख्यातनाम सिनेमॅटोग्राफर व्ही. एन. रेड्डी यांचे सुपुत्र रविकांत रेड्डी या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी करीत आहेत. स्वप्नील बांदोडकर, डॉ. नेहा राजपाल, रोहित राऊत, आनंदी जोशी व जावेद अली या गायकांनी ‘ओढ’ सिनेमाची गीते गायली आहेत.