‘कलर्स’ वाहिनीवरील ‘देवांशी’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री हेली शाहची कार चोरीला गेली आहे. मुंबईतील मिरा रोड येथे राहणाऱ्या हेलीची कार राहत्या घराखालूनच चोरीला जात असतानाचे फुटेज इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हेलीला आपली कार चोरीला गेल्याचे समजताच तिने पोलिसांकडे रितसर तक्रार केली आहे.

https://www.instagram.com/p/BXSz-ofj_Th/

Businessman pushes man off terrace of five-star hotel
..आणि व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन ढकलून दिलं, सीसीटीव्हीत कैद झाली घटना
Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

मिरा रोडमधील पूनम गार्डन परिसरातील सेरेनिटी या इमारतीत अभिनेत्री हेली राहते. ती आपली गाडी नेहमी इमारतीच्या समोरील रोडवर पार्क करते. सकाळी ‘देवांशी’ या मालिकेच्या चित्रीकरणाला जायचे म्हणून ती घरातून निघाली तेव्हा हेलीला आपली गाडी चोरीला गेल्याचे जाणवले. तिने तातडीने पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांना सीसीटीव्हीचे फुटेज मिळाले असून त्यांनी चोरांचा तपास सुरू केला आहे. बुधवारी पहाटे तीन- सव्वातीनच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी गाडी चोरल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BW7rqy1jtyi/

२०१०-११ मध्ये हेली शाहने ‘गुलाल’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. यानंतर तिने ‘लाइफ ओके’वरील ‘अलक्ष्मी हमारी सुपर बहू’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. ‘झी टीव्ही’वरील ‘खुशियों की गुल्लक आशी’ आणि ‘कलर्स’ टीव्हीवरील ‘स्वरागिनी’ या मालिकांमुळे हेलीला खरी ओळख मिळाली. सध्या ती ‘कलर्स’ टीव्हीवरील ‘देवांशी’ मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.