अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांचे प्रेम सर्वज्ञात आहे. विराटने स्वत:च त्याच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटद्वारे एक फोटो पोस्ट करत अनुष्कावरील प्रेमाची जाहीर कबुली नुकतीच दिली. सोशल मीडियावर अनुष्का आणि विराटची चर्चा तशी नवीन नाही. विराटने अनुष्कावरील त्याचे प्रेम व्यक्त केल्यानंतर सोशल मीडियामध्ये विराटच्या खेळी प्रमाणेच या दोघांच्या फोटोंचे वारे वाहताना दिसले. या दोघांच्याही फॅन पेजद्वारे त्यांचे सेल्फी पोस्ट करण्यात आल्या होत्या. विराट मैदानावर आल्यानंतर जसे परत फिरायचे नाव घेत नाही, अगदी तशीच काहिशी परिस्थिती आता विराट-अनुष्का या प्रेमी जोडींच्या फोटोबाबतही पाहायला मिळत आहे. विराट आणि अनुष्का याचा ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दुसऱ्या दिवशीचा हॉटेलमधील एक फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

यंदाच्या व्हॅलेंटाईनला विराट आणि अनुष्का यांनी एकत्र वेळ घालविताना दिसले होते. त्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱ्या दिवशी ज्या हॉटेलमध्ये डिनर केला त्या हॉटेल मालकाला या जोडीसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. रोहन पाटे या हॉटेल मालकाने विराट आणि अनुष्कासोबत सेल्फी काढला. एवढेच नाही तर या हॉटेल मालकाने विराट अनुष्कासोबतचा तो अविस्मरणीय क्षण इन्स्टाग्राम अकांऊटवरुन  शेअर सुद्धा केला. हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. विराट कोहली आणि अनुष्काचा चाहता वर्ग पाहता त्यांच्या नात्याविषयी जाणून घेण्यासाठी अनेकांमध्येच कुतुहलाचे वातावरण पाहायला मिळते. क्रिकेट आणि कलाविश्वामध्येही सध्या विरुष्काच्याच प्रेमाचा रंग लग्न बंधनात कधी बदलणार या चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

विराट कोहली आणि अनुष्का सध्यातरी त्यांच्या करिअरला प्राधान्य देत आहेत. त्यासोबतच समतोल राखण्याकडेही या दोघांचे तितकेच लक्ष आहे हे दोघांच्याही वागण्या-बोलण्यातून सिद्ध होत आहे. दरम्यान, व्हॅलेंटाईन डे ची हवा सर्वत्र पसरलेली असतानाच विराटने अनोख्या अंदाजात अनुष्कावरील त्याचे प्रेम व्यक्त केले होते. ‘तुम्ही समजाल तर प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाईन डे असतो’, असे म्हणत विराटने त्याच्या जीवनातील अनुष्काचे स्थान शब्दात व्यक्त करत एक फोटो पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये विराटने अनुष्काचाही उल्लेख केला होता. अनुष्का विषय बोलायचे तर या काळात तिने विराटसोबतचा एखादा फोटो किंवा क्षण उघडपणे शेअर केल्याचे दिसत नाही. यापूर्वी उत्तराखंडमध्ये विराटसोबत असताना अनुष्काने एक व्हिडिओ शेअर केला होता. पण तिने शेअर केलेल्या व्हिडिओतील व्यक्ती विराटच आहे हे स्पष्ट झाले नव्हते.