‘फेअर अॅण्ड लव्हली’ सलमान

आजही तो आपला पदार्पणाचा चित्रपट 'मैने प्यार किया' मधील नौजवान 'प्रेम' सारखाच दिसतो. त्यामुळेच

मुंबई | February 28, 2013 07:53 am

वयाच्या चाळीशीतही तरूण दिसणा-या सुपरस्टार सलमान खानच्या तरूण दिसण्यामागचे नेमके रहस्य काय आहे याबाबत नेहमीच सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली असते. आजही तो आपला पदार्पणाचा चित्रपट ‘मैने प्यार किया’ मधील नौजवान ‘प्रेम’ सारखाच दिसतो. त्यामुळेच आजही तो बॉलीवूडमधील मोस्ट ‘वॉन्टेड’ सुपरस्टार आहे.
नुकत्याच बॉलीवूड हंगामाच्या हाती आलेल्या बातमीनुसार सलमान खानला ‘फेअर अॅण्ड लव्हली’ या क्रिमचा ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर म्हणून घेण्यात आले आहे. असे असले तरी याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.  

First Published on February 28, 2013 7:53 am

Web Title: how will you get fair and lovely with salman khan