कंगना रणौतच्या सर्व वादग्रस्त वक्तव्यांकडे दुर्लक्ष करत अभिनेता हृतिक रोशन त्याच्या आयुष्यातील काही खास क्षणांचा पुरेपूर आनंद लुटतोय. हा ‘काबिल’फेम अभिनेता रेहान आणि रिदान यांच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवत आहे.

हृतिकने सोमवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘बॉइज नाइट आउट’चा फोटो शेअर केला. या फोटोतील सर्व पुरुष काळ्या रंगाचे जॅकेट आणि पांढरे शर्ट अशा डॅपर लूकमध्ये दिसतात. पण, त्यांचा हा फोटो काही एका झटक्यात काढण्यात आला नाही. तर मनासारखा फोटो यावा म्हणून हृतिकने फोटोग्राफरला बरेच फोटो काढायला लावले.

वाचा : राम रहिमवरील चित्रपटात ही अभिनेत्री साकारणार हनीप्रीतची भूमिका

याबद्दल हृतिकने लिहिलंय की, ‘माझ्या सुयोग्य फोटोच्या मागणीमुळे अनेकदा पोज द्यावी लागली.’ बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ योग्य फोटोचा अट्टाहास करत असताना त्याची दोन्ही मुले मात्र भुकेने व्याकूळ झाली होती, असे स्वतः हृतिकनेच त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. बॉइज नाइट आउट #boysnightout बाबा आपण कृपया फोटो काढणे थांबवू शकतो का #dadcanwestopclickingpicsnow आम्हाला भूक लागलीय #wearehungry असे हॅशटॅग्स त्याने कॅप्शनमध्ये वापरले आहेत.

वाचा : ‘बॉलिवूड पार्ट्यांमध्ये फक्त दारु आणि गॉसिपच असतं’

मुलांसोबत घालवलेला वेळ हृतिकसाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्यांच्यासोबतचे बरेचसे फोटो तो सोशल मीडियावर शेअरही करतो. विशेष म्हणजे, त्याच्या या फोटोंच्या कॅप्शन नेहमीच मजेशीर असतात.