‘बागी’ चित्रपटातील अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने ‘आशिकी-२’ मधील तिचा सहकलाकार आदित्य रॉय कपूरसोबत सुत जुळल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. आदित्य सोबतच्या प्रेमसंबंधांच्या चर्चा केवळ अफवा होत्या, त्यामध्ये काहीच नवीन नाही. मी अजूनही ‘सिंगल’ आहे, असे श्रद्धाने ‘द इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉम’शी बोलताना सांगितले.

बॉलीवूड वर्तुळात आदित्य आणि श्रद्धाच्या प्रेमसंबंधांची जोरदार चर्चा होती. मध्यंतरी त्यांचे बिनसल्याच्याही बातम्या झळकल्या होत्या.त्यानंतर पुन्हा एकदा त्यांचे ‘पॅचअप’ झाल्याचेही सांगितले जात होते. दोघंही लवकरच आपल्या आगामी ‘ओके जानू’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहेत. आम्ही दोघांना चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी लोक आतुर आहेत याची कल्पना मला आहे. पण ओके जानू हा चित्रपट आशिकी-२ च्या धाटणीचा नाही. हा चित्रपट बराच वेगळा असणार आहे आणि यात काम करताना मला नक्कीच आनंद होत आहे, असे श्रद्धाने सांगितले.