एकेकाळी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री आयशा टाकिया गेल्या काही वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दुरावली आहे. बऱ्याच कालावधीनंतर ती लवकरच ‘बोरिवली का ब्रुस ली’ या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे.

‘स्पॉटबॉयइ डॉट. कॉम’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत आयशाने म्हटले की, ‘मी सोशल मीडियावर सक्रिय नसते. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातच व्यग्र असते. नातेवाईक, जवळचे मित्र-मैत्रिणी यांच्याच संपर्कात असते. हे सर्व चित्रपटसृष्टीशी संबंधित नाहीत. पार्ट्यांमध्ये जाणं किंवा अनेक लोकांना भेटणं मला आवडत नाही .’

https://www.instagram.com/p/BY4_PTBnl76/

वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर

सलमान खानसोबत ‘वॉन्टेड’ चित्रपटात झळकल्यानंतर ती बॉलिवूडपासून दूरच राहिली. पण या चित्रपटातील सलमान आणि तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली. भविष्यातील प्रोजेक्ट्ससाठी ती दबंग खानच्या संपर्कात आहे का, असा प्रश्न विचारला असता ती म्हणाली की, ‘कामासाठी मी कधीच कोणाला फोन केला नाही आणि भविष्यात करणारही नाही.’