24 October 2017

News Flash

‘मेलबर्न  आयएफएफएम २०१७’ मध्ये मुलीसह ऐश्वर्याने केले ध्वजारोहण

ऐश्वर्याने पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा अनारकली ड्रेस घातला होता

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 12, 2017 7:08 PM

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या आपल्या मुलीसोबत मेलबर्न येथे ‘आयएफएफएम २०१७’ मध्ये वेस्टपॅक अवॉर्डच्या रेड कार्पेट सोहळ्यासाठी पोहोचली आहे. १२ ऑगस्टच्या सकाळी ऐश्वर्याने फेडरेशन स्क्वेअर येथे ध्वजारोहण केले. या कार्यक्रमावेळी ऐश्वर्या नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. तिने पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा अनारकली ड्रेस घातला होता. त्यावर हिऱ्यांचे दागिने आणखीनच उठावदार दिसत होते. कमीत कमी मेकअप आणि त्यावर तिचे मनमोहक हसू उपस्थितांची मनं जिंकत होते.

#aishwaryaraibachchan arrives at #iffm2017 with daughter #aradhyabachchan #aishwaryarai #melbourne #bollyholics__

A post shared by BOLLYHOLICS (@bollyholics__) on

ऐश्वर्याची मुलगी आराध्याही खूप गोड दिसत होती. आराध्याने आईसारखाच पांढऱ्या रंगाचा घाघरा घातला होता. भारताचे राष्ट्रगीत सुरू झाल्यावर आराध्याने ध्वजाला मानवंदना दिली. ऐश्वर्याने या कार्यक्रमात भाषण देताना म्हटले की, ‘भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. मला इथे येऊन जो मान मिळाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. मला हा दिवस नेहमीच लक्षात राहिल.’ ‘आयएफएफएम २०१७’ सोहळ्यात ध्वजारोहण करणारी ऐश्वर्या ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे. या सोहळ्याला ती खास पाहुणी म्हणूनही हजर होती.

मेलबर्न येथे ११ ऑगस्ट ते २० ऑगस्टदरम्यान रंगणाऱ्या ‘इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न’मध्ये ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे मुख्य अतिथी आहेत. महिला सक्षमीकरणही यंदाच्या महोत्सवाची थीम आहे. इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्नची अ‍ॅम्बेसिडर विद्या बालन हिची महोत्सवातील उपस्थिती म्हणूनच अधिक लक्षवेधी ठरणार आहे. एकंदर दहा दिवसांच्या या महोत्सवात वेगवेगळ्या रंगारंग कार्यक्रमांची उधळण होणार आहे.

First Published on August 12, 2017 2:52 pm

Web Title: iffm 2017 aishwarya rai bachchan and aaradhya bachchan in iffm 2017 host the indian flag