बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक मोठा खुलासा केला आहे. तिचा हा खुलासा वाचून तुम्हालाही धक्का बसेल. इलियाने दोन ट्विट करत एका चाहत्याने तिच्यासोबत छेडछाड केली असल्याचे सांगितले. अनेकदा अशा छेडछाडीचा सामना सर्वसामान्य मुलींनाच करावा लागतो असा अनेकांचा समज असतो. पण सेलिब्रिटी असले तरीही शेवटी ती एक स्त्रीच आहे असे सांगून इलियानाने हे वास्तव सर्वांसमोर आणले.

मुलीमुळे रणदीप सुश्मिताच्या प्रेमात, ब्रेकअपनंतर बदलले आयुष्य

इलियाना डिक्रूझने ‘बर्फी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्या पहिल्याच सिनेमातून तिने अनेकांकडून शाबासकी मिळवली होती. अजय देवगण याच्या ‘बादशाहो’ या आगामी सिनेमातही तिची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये ती व्यग्र आहे.

आपल्या दोन्ही ट्विटमध्ये तिने घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे. पण, नेमकी ही घटना कुठे घडली हे मात्र तिने सांगितले नाही. इलियाने तिच्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘मला माहितीये की आपण एका निष्ठुर जगात जगत आहोत. मी एक सेलिब्रिटी आहे. माझ्या खासगी आयुष्याबद्दल मी नेहमीच गुप्तता बाळगू शकत नाही, याचीही मला पूर्ण कल्पना आहे.’

तर दुसऱ्या ट्विटमध्ये तिने लिहिले की, ‘पण याचा अर्थ असा होत नाही की, मी एक स्त्री आहे म्हणून कोणताही पुरूष माझ्यासोबत गैरवर्तन करेल.’ तिच्या या दोन ट्विटवरुन तिच्यासोबत चाहत्यांनी गैरव्यवहार केले असतील असे स्पष्ट होते. इलियानासोबतची ही काही पहिली घटना नाहीये. याआधीही तिने महिलांच्या सुरक्षेसाठी आवाज उठवला होता.

या एका ट्विटमुळेच इलियाना चर्चेत आलीये असं नाही. तिचा आगामी ‘बादशाहो’ हा सिनेमाही सध्या विवादात अडकला आहे. अजय देवगण आणि तिच्यात असणाऱ्या एका सीनवर दिग्दर्शक मिलन लुथरिया यांनी कात्री लावल्याचे बोलले जाते. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या सिनेमातील गाणीही सध्या फार गाजत आहेत.

रजत अरोरा यांनी लिहिलेला हा सिनेमा १ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘बादशाहो’ सिनेमासाठी अजय देवगण, इम्रान हाश्मी आणि मिलन लुथरिया दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. याआधी ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या सिनेमा दोघांनी एकत्र काम केलंय. हा सिनेमाही सुपरहिट ठरला होता. त्यामुळे या त्रिकूटाची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांवर होणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.