बॉलिवूडची सगळ्यात बोल्ड अभिनेत्री म्हणून सनी लिओनीकडे पाहिले जाते. सनी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. तिचे नवनवीन सिनेमे, कार्यक्रम यांची माहिती ती सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांना सतत देत असते. सामाजिक कार्यासाठी ही सनी आपल्यापरिने लोकांना सहकार्य करत असते. मग ते स्तनांच्या कर्करोगाबद्दल जनजागृती असो किंवा प्राण्यांसाठीची मदत असो. सनीने नुकताच अजून एक व्हिडिओही शेअर केला आहे. यात ती आपल्या पतीसोबत दिसत आहे. तिने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती यात एका कुत्र्याला दत्तक घेण्याच आवाहन करत आहे.

[jwplayer kMzV64BD-1o30kmL6]

Man wraps utensils in plastic to avoid washing them.
भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
girls presents old famous advertisement video goes viral on social media
90’s चा काळ कधी परत येणार नाही! तरुणींनी दाखवली जुन्या लोकप्रिय जाहिरातींची झलक, Video एकदा पाहाच
How to Make Cabbage Vada Recipe summer food
चिरलेला कोबी- वाटीभर बेसन, या विकेण्डला घरीच करा कुरकुरीत कोबीचे वडे, चविष्ट रेसिपी-आवडेल सर्वांना

व्हिडिओमध्ये सनी, पति डॅनियल वेबरसोबत आपल्या चाहत्यांना आग्रह करताना दिसत आहे. सनी म्हणते की, या कुत्र्याचे नाव हार्ले आहे, त्याला एक घर हवंय. हा कुत्रा खरंच खूप चांगला आहे. मला असं वाटतं की कोणीतरी याला दत्तक घ्यावे. जो कोणी या कुत्र्याला दत्तक घेईल, त्याला ती स्वतः हे कुत्रे देणार आहे. त्यामुळे जर तुम्ही प्राणी प्रेमी असाल आणि त्यातही जर तुम्ही सनी लिओनीचेही चाहते असाल तर मग ही एक खास संधी सनीनेच तुमच्यासाठी आणली आहे. सनीच्या व्यावसायिक करिअरबद्दल विचार केला तर, ती सध्या तिचा आगामी सिनेमा तेरा इंतजारच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. या सिनेमात ती अरबाज खानसोबत दिसणार आहे.

सनी आणि अरबाज खान हे दोघे प्रथमच राजीव वालिया यांच्या ‘तेरा इंतजार’ या म्युझिकल रोमॅण्टिक सिनेमासाठी एकत्र आले आहेत. या सिनेमाच्या दुसऱ्या सत्राचे चित्रीकरण मॉरिशस येथे करण्यात आले होते. या सिनेमाची ही हटके जोडी पाहून याचे नक्की कथानक असणार तरी काय असाच प्रश्न अनेकांना पडला आहे. या सिनेमाचे काही फोटो अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोत अरबाज आणि सनी एकमेकांची कंपनी एन्जॉय करताना दिसले. या फोटोतून सनी व अरबाजचा सिनेमातील लुकही चाहत्यांना पाहायला मिळतोय. या दोघांनी ‘कच्छ’ येथे २५ दिवसांचे सिनेमाचे चित्रिकरण पूर्ण केले. आता पुढील चित्रिकरणासाठी ते मॉरिशसला गेले होते.

[jwplayer GQEDrO4u-1o30kmL6]