बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानविरोधात आयकर विभागाने दाखल केलेल्या आरोपातून शाहरुख खानला दिलासा मिळाला आहे. शाहरुखने कर चुकवेगिरी केल्याप्रकरणी आयकर विभागाने शाहरुखला दोन नोटिसी पाठवल्या होत्या. त्याला पाठविण्यात आलेल्या या नोटिसीवर आयकर लवादाने शाहरुखच्या बाजूने निकाल दिला आहे. शाहरुख खानने टेलिव्हिजनवरील ‘कौन बनेगा करोडपती’ या मालिकेतून मिळालेल्या १० कोटी रुपयांच्या कमाईवर तसेच ‘स्टार इंडिया’कडून ७ कोटींचे मानधन स्वीकारल्याबद्दल आयकर विभागाने शाहरुखला पाठविलेल्या नोटिसीप्रकरणी आयकर लवादाने शाहरुखच्या बाजूने निकाल दिला आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ आणि ‘स्टार इंडिया’ यांच्याकडून शाहरुखने मानधन मिळविल्याप्रकरणी आयकर विभागाने जवळ जवळ आठ महिन्यांपूर्वी शाहरुखला नोटीस पाठविली होते. या नोटिसीमध्ये आयकर विभागाने शाहरुखकडे बरमुडा, दुबईमधील गुंतवणूकीबद्दलची माहिती देखील मागितली होती.याप्रकरणी निकाल देताना आयकर लवादाने म्हटले आहे की, ‘स्टार इंडिया’ आणि खान यांच्यामध्ये १०४ भागांसाठी करार करण्यात आला होता. पण यापैकी ५२ भाग प्रसारित झाल्यानंतर वाहिनीने हा कार्यक्रम बंद केला. उरलेल्या भागाचे पैसे परत न करता शाहरुखने ही रक्कम आयपीएल संघामध्ये गुंतवली. कोलकाता नाइट राइडर्सचे हक्क स्टार इंडियाला देऊन त्याने सेटलमेंट केली होती. नोटिसीनंतर शाहरुखने पैसे खर्च करण्याचा दावा करत १० कोटीं रुपयाची सूट मिळावी, असा दावा केला होता. मात्र आयकर विभागाने नोटिसीद्वारे कर भरण्यास सांगितले होते.

NARENDRA MODI
‘पंतप्रधान मोदींनी निवडणूक लढविण्यावर ६ वर्षांची बंदी घाला’, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल; कारण काय?
kejriwal arrest
न्यायालयांचा केजरीवाल यांना पुन्हा धक्का; तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ?
Delhi Chief Minister Arvind Kejriwal
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धक्का; अटकेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
supreme-court_
मदरसा कायदा रद्द करण्यास अंतरिम स्थगिती; अलाहाबाद उच्च न्यायालयाने चुकीचा अर्थ लावला- सर्वोच्च न्यायालय

दुसऱ्या प्रकरणामध्ये शाहरुखने स्टार इंडियासोबत लंडन आणि दुबईमधील पत्रकार परिषदेमध्ये सहभागी झाला होता. या कार्यक्रमामध्ये शाहरुखला मानधन दिल्याचे आयकर विभागाने म्हटले होते. शाहरुखने मानधन स्वीकारल्याचे नाकारले होते. मात्र आयकर विभागाने शाहरुखकडे ७ कोटीं रुपये टॅक्सची मागणी केली होती. या प्रकरणासंबंधी आयकर लवादासमोर आपली बाजू मांडताना शाहरुख म्हणाला होती की, याचे प्रसिद्धी करण्यात आली नसल्यामुळे मानधन स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही. या प्रकरणासंबंधी आयकर लवादाने शाहरुखला दिलासा दिल्यानंतर आयकर विभाग मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याबाबत विचार करत आहे.